Maruti Victoris vs Hyundai Creta : SUV घ्यायचीय? मग ही तुलना पाहिल्याशिवाय निर्णय घेऊ नका!

WhatsApp Group

Maruti Victoris vs Hyundai Creta : SUV सेगमेंटमध्ये खऱ्या अर्थाने युद्ध सुरू झालं आहे! कारण आता मार्केटमध्ये आलीये Maruti Suzuki ची नवी दमदार SUV – Victoris. ही SUV थेट भारतात सर्वाधिक विकली जाणाऱ्या Hyundai Creta ला टक्कर देण्यास सज्ज आहे. Creta चं वर्चस्व तोडण्यासाठी Victoris ने जबरदस्त फीचर्स, मायलेज आणि किंमतीचा डाव टाकलाय. पण खरोखरच Victoris, Creta ला मागे टाकू शकेल का? चला पाहूया या दोन SUV मधील सर्व पैलूंची तुलना.

किंमतीचं गणित : कोण जास्त ‘Value for Money’?

Maruti Victoris चा बेस पेट्रोल LXi वेरिएंट 10.49 लाखांपासून सुरू होतो, तर टॉप स्ट्रॉन्ग हायब्रिड व्हेरिएंटची किंमत 19.98 लाख रुपये आहे. पेट्रोल, हायब्रिड आणि CNG अशा तिन्ही पर्यायांसह ही SUV ग्राहकांच्या सर्व गरजांची पूर्तता करते.

दुसरीकडे Hyundai Creta ची सुरुवात 10.73 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून होते आणि टॉप ट्रिम 24 लाखांपर्यंत जातो. Creta मध्ये पेट्रोल, डिझेल आणि टर्बो अशा तिन्ही इंजिन पर्यायांचा समावेश आहे. किंमतीच्या बाबतीत Victoris थोडी स्वस्त असली तरी Creta चे अनेक वेरिएंट्स आणि इंजन पर्याय Victoris ला तगडी टक्कर देतात.

इंजिन आणि परफॉर्मन्स : कोण आहे अधिक दमदार?

Victoris मध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन, मायलेजसाठी स्ट्रॉन्ग हायब्रिड, किफायतशीर प्रवासासाठी CNG आणि ऑफ-रोडिंगसाठी AWD कॉन्फिगरेशन दिलं गेलं आहे. बेस पेट्रोल व्हेरिएंट 21.18 किमी/लीटर पर्यंत मायलेज देतो. त्यात 210 मिमी ग्राउंड क्लीयरन्स आहे, त्यामुळे खराब रस्त्यांवरही चालवायला सोयीची.

Creta मात्र परफॉर्मन्सवर भर देणारी आहे. तिच्यात 1.5-लिटर पेट्रोल, डिझेल आणि टर्बो वर्जन उपलब्ध आहेत. मायलेज सामान्यतः 17-18 किमी/लीटर च्या आसपास आहे. डिझेल इंजिन अजूनही ग्रामीण आणि लांब प्रवास करणाऱ्यांसाठी प्रचंड लोकप्रिय आहे.

फीचर्स : Victoris अधिक टेक्नोलॉजीयुक्त का?

Victoris मध्ये Level 2 ADAS, डॉल्बी अ‍ॅटमॉस हार्मन साउंड सिस्टम, अ‍ॅलेक्सा व्हॉइस कंट्रोल, 10.25-इंच डिजिटल क्लस्टर यांसारखी प्रीमियम फीचर्स दिली आहेत. याशिवाय, 5-स्टार Bharat NCAP रेटिंग आणि मल्टीपल एअरबॅग्ससारखी सुरक्षा वैशिष्ट्येही आहेत.

हेही वाचा – फेस्टिवल धमाका! मारुती सुझुकी ‘ही’ गाडी झाली तब्बल ₹94,000 ने स्वस्त – आता कार खरेदीसाठी सुवर्णसंधी!

Creta मध्ये एलईडी लाइट्स, वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि आता टॉप ट्रिम्समध्ये ADAS देखील दिलं जातं. मात्र, टेक्नोलॉजीच्या बाबतीत Victoris हलकीशी आघाडीवर आहे.

Victoris की Creta – बेस्ट SUV कोणती?

जर तुम्ही टेक्नोलॉजी, मायलेज आणि वेगवेगळ्या इंधन पर्यायांवर भर देत असाल, तर Victoris हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. पण तुम्हाला परफॉर्मन्स, डिझेल इंजिन आणि ब्रँड व्हॅल्यू हवी असेल, तर Creta अजूनही बाजी मारते.

2025 च्या SUV युद्धात कोणी बाजी मारते हे पाहणे खूपच रोचक ठरणार आहे!

Leave a Comment