MG Majestor SUV : भारतीय फुल-साइज SUV सेगमेंटमध्ये मोठा उलथापालथ करणारी बातमी समोर आली आहे. MG Motor India आपली नवी आणि सर्वात प्रीमियम 7-सीटर SUV ‘MG Majestor’ भारतात 12 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतपणे लाँच करणार आहे. ही SUV थेट Toyota Fortuner, Skoda Kodiaq, Jeep Meridian यांसारख्या दिग्गज गाड्यांना आव्हान देणार आहे.
ही SUV MG च्या सध्याच्या लाइनअपमधील सर्वात टॉप-एंड आणि फ्लॅगशिप मॉडेल असणार असून, Gloster च्या वरच्या सेगमेंटमध्ये पोझिशन केली जाईल.
Bharat Mobility Expo मध्ये पहिली झलक
MG Majestor ने Bharat Mobility Global Expo 2025 मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक पदार्पण केलं होतं. त्या वेळी MG ने Majestor सोबत Cyberster आणि M9 ही दोन मॉडेल्सही सादर केली होती. ही दोन्ही वाहने सध्या MG Select (Premium Dealerships) मार्फत विक्रीस उपलब्ध आहेत.
Gloster पेक्षा अधिक आक्रमक आणि प्रीमियम SUV
MG स्पष्टपणे सांगते की Majestor ही Gloster ची जागा घेणार नाही, तर ती त्याच्या वरची, अधिक लक्झरी आणि दमदार SUV असेल. ही SUV Maxus D90 body-on-frame platform वर आधारित असून, जागतिक बाजारात आधीच वापरात असलेली मजबूत चेसिस आहे.
.@MGMotorIn’s new flagship SUV is almost here. The Majestor is set to launch on February 12, 2026, and it’s positioned right at the top of the brand’s SUV line-up in India. First shown at Auto Expo 2025, the big SUV has also been spotted testing on our roads, hinting that launch… pic.twitter.com/PpQoZdVhM9
— OVERDRIVE (@odmag) January 16, 2026
जबरदस्त डिझाइन – पहिल्या नजरेत प्रेम
MG Majestor चा लूक पूर्णपणे वेगळा आणि आक्रमक आहे.
फ्रंट लूक:
- डार्क फिनिश ग्रिल
- शार्प LED DRLs
- व्हर्टिकल LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स
- नवे बंपर आणि मजबूत स्किड प्लेट्स
साइड प्रोफाइल:
- 19-इंच ट्विन-स्पोक अलॉय व्हील्स
- जाड ब्लॅक क्लॅडिंग
- ब्लॅक्ड-आउट रूफ आणि पिलर्स
रियर डिझाइन:
- नव्या टेललॅम्प्स
- टेलगेटवर मोठं “Majestor” बॅजिंग
- ड्युअल एक्झॉस्ट सेटअप
- रग्ड बंपर डिझाइन
एकूणच, ही SUV रोडवर पूर्णपणे ‘Boss Look’ देणारी आहे.
हेही वाचा – फक्त ₹1 लाख Down Payment मध्ये MG Windsor EV घरात! दरमहा EMI, व्याज, पूर्ण खर्च जाणून घ्या
213 bhp पॉवर – Fortuner ला थेट टक्कर
MG Majestor मध्ये देण्यात येणार आहे 2.0-लिटर, 4-सिलेंडर ट्विन-टर्बो डिझेल इंजिन, जे आधीच Gloster मध्ये वापरले जाते.
इंजिन स्पेसिफिकेशन:
- पॉवर: 213 bhp
- टॉर्क: 478 Nm
- ट्रान्समिशन: Automatic
- ड्राइव्ह: Optional 4WD (Four-Wheel Drive)
ही पॉवर आकडेवारी पाहता, Majestor ही Fortuner पेक्षाही अधिक दमदार SUV ठरण्याची शक्यता आहे.
आतून पूर्णपणे लक्झरी SUV
MG Majestor चं इंटीरियर म्हणजे लक्झरी + टेक्नॉलॉजी यांचा परफेक्ट संगम.
प्रमुख फीचर्स:
- 12.3-इंच टचस्क्रीन (Wireless Apple CarPlay, Android Auto)
- 12.3-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले
- 12-स्पीकर प्रीमियम साउंड सिस्टम
- MG iSmart Connected Car Technology
- Ventilated + Massage Function असलेली Powered Seats
- Panoramic Sunroof
- 3-Zone Automatic Climate Control
सेफ्टीमध्येही No Compromise
MG Majestor मध्ये Level-2 ADAS सेफ्टी फीचर्स देण्यात येणार आहेत.
- 360-Degree Camera
- Adaptive Cruise Control
- Lane Assist
- Emergency Braking
- Advanced Driver Assistance System
ही SUV कुटुंबासाठीही एक अत्यंत सुरक्षित पर्याय ठरणार आहे.
लाँच डेट आणि अपेक्षित प्रभाव
Launch Date: 12 फेब्रुवारी 2026
MG Majestor लाँच होताच भारतीय SUV बाजारात नवा ट्रेंड सेट करेल, असं ऑटो एक्सपर्ट्स मानतात.