Safari आणि Sierra नंतर Tata Sumo ची एंट्री?

WhatsApp Group

New Gen Tata Sumo : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी Tata Motors सध्या आपल्या जुन्या, लोकप्रिय मॉडेल्सना नव्या अवतारात सादर करण्यावर भर देताना दिसते. Safari आणि नुकतीच लाँच झालेली New-Gen Tata Sierra यावरून हे स्पष्ट झाले आहे. आता सोशल मीडियावर एक प्रश्न जोरात विचारला जात आहे – “पुढचा नंबर Tata Sumo ची?”

1990 आणि 2000 च्या दशकात Tata Sumo हे नाव भारतातील प्रत्येक गाव-शहरात ओळखीचं होतं. प्रवासी वाहन असो वा व्यावसायिक वापर, Sumo ने अनेक वर्षे भारतीय रस्त्यांवर राज्य केलं. आता त्याच Sumo चा नव्या पिढीतील (New-Gen) अवतार सोशल मीडियावर व्हायरल होत असून, गाड्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

कसं आहे नवीन डिझाइन?

ही संकल्पनात्मक (Concept) रेंडरिंग Instagram वरील ‘thebikerman_’ या प्रसिद्ध डिजिटल आर्टिस्टने तयार केली आहे. या डिझाइनमध्ये जुन्या Tata Sumo ची मजबूत ओळख जपत, तिला आधुनिक SUV टच देण्यात आला आहे.

समोरून पाहिल्यास, गाडीला स्लीक आणि आकर्षक ग्रिल मिळते. यासोबत कॉम्पॅक्ट LED हेडलॅम्प्स आणि इंटिग्रेटेड LED DRLs देण्यात आले आहेत. हेडलॅम्प्सचा डिझाइन काहीसा Jeep Compass ची आठवण करून देतो. खालील बाजूला मजबूत बंपर, रग्ड स्किड प्लेट आणि ब्लॅक अॅक्सेंट्स दिले असून, SUV ला एक दमदार लूक मिळतो. सरळ आणि उभा बोनट गाडीला पारंपरिक Sumo सारखाच मर्दानी स्वभाव देतो.

साइड प्रोफाइल: साधेपणा पण ताकद

गाडीचा साइड प्रोफाइल साधा ठेवण्यात आला असून, कोणतेही अतिरेकी क्रीजेस नाहीत. मोठे आणि स्टायलिश अ‍ॅलॉय व्हील्स, मोठे व्हील आर्चेस आणि ब्लॅक साइड पिलर्स गाडीचा रोड प्रेझेन्स वाढवतात. काही ऑटोप्रेमींना व्हील आर्चेसभोवती ब्लॅक क्लॅडिंग असती तर आणखी रग्ड लूक मिळाला असता, असं वाटू शकतं.

हेही वाचा – इलेक्ट्रिक कार टो करणे म्हणजे स्वतःचं नुकसान! 99% लोकांना ‘ही’ मोठी चूक माहीत नाही

मागील बाजू: बॉक्सी आणि मजबूत ओळख

मागील बाजूस, रूफ-माउंटेड स्पॉइलर, टेलगेटवर बसवलेलं स्पेअर व्हील, स्लीक LED टेललॅम्प्स आणि मजबूत स्किड प्लेट देण्यात आली आहे. एकूणच गाडीचा बॉक्सी सिलुएट आणि उभी रचना पाहता, जुनी Tata Sumo आठवते – पण पूर्णपणे आधुनिक स्वरूपात.

Tata Motors खरंच New-Gen Sumo आणेल का?

सध्या Tata Motors कडून New-Gen Sumo बाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र Safari आणि Sierra सारख्या आयकॉनिक नावांना पुन्हा जिवंत केल्यावर, Sumo चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जर Tata ने ही SUV बाजारात आणली, तर ग्रामीण भारत, फ्लीट ऑपरेटर्स आणि मोठ्या कुटुंबांसाठी ही गाडी मोठा गेम-चेंजर ठरू शकते.

तुम्हाला New-Gen Tata Sumo रस्त्यावर पाहायला आवडेल का? सोशल मीडियावर सध्या याच प्रश्नाची चर्चा रंगली आहे.

Leave a Comment