
सुझुकी कंपनीने नव्या जनरेशनची स्विफ्ट (New Generation 2024 Suzuki Swift In Marathi) जपानमध्ये लाँच केली आहे. त्यामुळे आता भारतातही ती येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. सुझुकीने यंदाच्या टोकियो मोटर शोमध्ये नवीन जनरेशनची स्विफ्ट दाखवली होती. आता त्याचे इंजिन, फीचर्स आणि पॉवर आउटपुटची माहिती समोर आली आहे.
नवीन जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट 2024 च्या उत्तरार्धात भारतात लाँच केली जाऊ शकते. फोटोंनुसार, नवीन स्विफ्ट खूपच आधुनिक आणि अपडेटेड दिसते. कंपनीने त्याच्या पुढील आणि मागील प्रोफाइलमध्ये बरेच बदल केले आहेत आणि इंजिनला देखील एक मोठे अपडेट दिले गेले आहे.

इंजिन
जपानमध्ये लाँच होणार्या नवीन स्विफ्टमध्ये 1197cc, 12 वॉल्व्ह DOHC इंजिन आहे. हे इंजिन माईल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. हे इंजिन 82 bhp ची पीक पॉवर आणि 108 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. कंपनीने या कारमध्ये 3.1 BHP पॉवर आणि 60 Nm टॉर्क जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर बसवली आहे. ही हायब्रीड सिस्टम सेल्फ चार्जिंग आहे, जी कार सुरू होताच आपोआप चार्ज होण्यास सुरुवात होते. हायब्रीड सिस्टिमची बॅटरी स्वतंत्रपणे चार्ज करण्याची गरज नाही.
हेही वाचा – सेफ्टीत आणि भारी दिसण्यात 1 नंबर गाडी, 10 लाखात अजून काय हवं!
मायलेज
हायब्रीड इंजिनमुळे स्विफ्टचे मायलेजही वाढेल. जपानमध्ये लाँच होणार्या नवीन जनरेशनच्या स्विफ्टचे स्टँडर्ड व्हेरिएंट 23.4 किमी प्रति लीटरचे मायलेज देईल, तर हायब्रिड व्हेरिएंट सुमारे 25 किमी प्रति लिटर मायलेज देईल.

किंमत
नवीन स्विफ्ट भारतात 2024 च्या शेवटी लाँच केली जाऊ शकते. ही जपानी मॉडेलप्रमाणेच इंजिन आणि फीचर्ससह येईल. इंजिनचे ट्यूनिंग बदलले जाऊ शकते ज्यामुळे पॉवरमध्ये फरक होऊ शकतो. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ही 6.5 लाख ते 6.7 लाख रुपयांच्या दरम्यान लाँच केली जाऊ शकते.