
Mahindra Thar 2025 : भारतीय SUV प्रेमींसाठी आज मोठी बातमी आहे! Mahindra ने आपली लोकप्रिय ऑफ-रोड SUV – थार 3-डोअर चे फेसलिफ्ट मॉडेल अधिकृतपणे लाँच केलं आहे. किंमत फक्त ₹9.99 लाखांपासून सुरू (एक्स-शोरूम) होत असून टॉप वेरिएंटची किंमत ₹16.99 लाखांपर्यंत जाते.
डिझाईन आणि बाह्य बदल : जुनी ओळख, नव्या टचसह
थारचा खडतर आणि दमदार लुक तसाच राहिलेला असला तरी अनेक सूक्ष्म पण महत्त्वाचे अपडेट्स करण्यात आले आहेत:
- बॉडी-कलर रेडिएटर ग्रिल
- सिल्व्हर ट्रिमसह ड्युअल-टोन बंपर
- मागील भागात रिअर वॉशर, वाइपर आणि पार्किंग कॅमेरा
- जुने अलॉय व्हील्स कायम, पण दोन नवीन रंग – टॅंगो रेड आणि बॅटलशिप ग्रे
केबिनमधील अपडेट्स : आता अधिक स्मार्ट आणि सोयीस्कर
थारच्या आतील रचना आता अधिक आधुनिक आणि युजर-फ्रेंडली बनली आहे:
- पिलर-माउंटेड ग्रॅब हँडल्स – आता चढणं-उतरणं अधिक सहज
- डोअर पॅनलवर पावर विंडो स्विच
- नवीन 10.25 इंच टचस्क्रीन – Android Auto, Apple CarPlay
- ‘Adventure Stats’ फीचर – Altitude, Pitch, Bank Angle यांसारखे ऑफ-रोड मेट्रिक्स
- स्लायडिंग आर्मरेस्ट, रिअर एसी व्हेंट्स आणि नवीन स्टीयरिंग व्हील
#MahindraThar Levels Up: Classic Grit Meets Modern Comfort at ₹ 9.99 Lakhhttps://t.co/X5Tr6LjHj5 pic.twitter.com/NGVeGVXHOC
— NamasteCar 🙏🏻🚗 (@NamasteCar) October 3, 2025
इंजिन आणि परफॉर्मन्स : विविध ऑप्शनसह दमदार परफॉर्मन्स
नव्या थारमध्ये 3 इंजिन पर्याय आणि 2 ट्रान्समिशन ऑप्शन्स देण्यात आले आहेत:
- 1.5L डिझेल (D117 CRDe)
- 2.2L mHawk डिझेल
- 2.0L mStallion पेट्रोल
- 6-स्पीड मॅन्युअल व 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन
हेही वाचा – CNG हवीय? SUV पण हवी? मग ‘ही’ गाडी बघाच, दमदार इंजिन आणि कमी खर्च!
महिंद्रा थार 3-डोअर – सर्व व्हेरिएंट्सची किंमत (एक्स-शोरूम)
1.5L डिझेल | 2.2L डिझेल | 2.0L पेट्रोल | |
AXT RWD MT | ₹9.99 लाख | — | — |
LXT RWD MT | ₹12.19 लाख | — | — |
LXT RWD AT | — | — | ₹13.99 लाख |
LXT 4WD MT | — | ₹15.49 लाख | ₹14.69 लाख |
LXT 4WD AT | — | ₹16.99 लाख | ₹16.25 लाख |
काही अपेक्षित फीचर्स नाहीत…
ग्राहकांच्या अपेक्षेनुसार 360 डिग्री कॅमेरा, वेंटिलेटेड सीट्स, आणि अॅडव्हान्स्ड सस्पेन्शन हे फीचर्स देण्यात आलेले नाहीत. सस्पेन्शन सेटअप देखील पूर्वीसारखाच आहे.
क्लासिक थारमध्ये टेक अपग्रेडचा धमाका!
नवीन महिंद्रा थार 3-डोअर SUV ही जुन्या जबरदस्त ओळखीला टिकवून ठेवत, आतून अधिक आधुनिक आणि टेक्नोलॉजिकल बनली आहे. ऑफ-रोडिंग चाहत्यांसाठी ही SUV अजूनही पहिल्या पसंतीस उतरते आणि नव्या फीचर्समुळे त्यात एक नवा झळाळाट आला आहे.