
मारुती सुझुकी सध्या भारतात माइल्ड-हायब्रिड (SHVS) तंत्रज्ञानाची Ertiga आणि XL6 MPVs विकते. मात्र, आता सुझुकीने इंडोनेशिया इंटरनॅशनल मोटर शोमध्ये नवीन Ertiga Cruise Hybrid सादर केली आहे. या नवीन मॉडेलमध्ये डिझाइनमध्ये अनेक बदल करण्यात आले असून हायब्रीड प्रणालीमध्ये लिथियम-आयन बॅटरीची क्षमता देण्यात आली आहे.
नवीन सुझुकी एर्टिगा क्रूझ हायब्रिड मोठ्या 10Ah बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे, जो 1.5-लिटर K15B नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह जोडलेला आहे. असा दावा करण्यात आला आहे की मोठा बॅटरी पॅक उत्तम परफॉरमन्स आणि हाय एफिशियन्सी देईल.
या गाडीत आयडल स्टार्ट/स्टॉप फीचर्स दिले आहे, जे फ्युल एफिशियन्सी वाढविण्यात देखील मदत करते. बॅटरी आठ वर्षांच्या वॉरंटीसह ऑफर केली जाते. इंजिन 103bhp कमाल पॉवर आणि 137Nm पीक टॉर्क आउटपुट तयार करते.
साइड प्रोफाइलमध्ये नवीन साइड बॉडी डेकल आणि नवीन साइड अंडर स्पॉयलर आहे. यात 15 इंची अलॉय व्हील्स आहेत. MPV प्रोजेक्टर हेडलॅम्प तसेच बंपर-माउंट एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प आहे.
या गाडीच्या मागील बाजूस नवीन रियर अपर स्पॉयलर आणि नवीन रियर गार्निश डिझाइन आहे. केबिनला ऑल-ब्लॅक इंटीरियर स्कीम मिळते. ही गाडी सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि सेंटर कन्सोलमध्ये व्हेंटिलेटेड कप होल्डर्ससह येते.
हेही वाचा – नवीन Kawasaki Z650RS 2024 लाँच, किंमत 7 लाख रुपयांपासून सुरू
यात प्रवाशांसाठी क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि आर्मरेस्ट देखील आहे. इंडोनेशियामध्ये या गाडीची किंमत IDR 288,000,000 लाख (सुमारे 15.25 लाख भारतीय रुपये) पासून सुरू होते.