घाणेरडे टॉयलेट दाखवा आणि ₹1,000 चा FASTag रिचार्ज मिळवा! NHAI ची भन्नाट मोहीम सुरू

WhatsApp Group

NHAI Cleanliness Drive : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशभरातील महामार्ग वापरकर्त्यांसाठी एक आगळीवेगळी मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाअंतर्गत आता प्रवाशांना टोल प्लाझाजवळील घाणेरडी टॉयलेट्सची माहिती दिल्यास थेट ₹1,000 चा FASTag रिचार्ज मिळणार आहे. ही योजना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत लागू राहणार आहे.

कसा मिळेल ₹1,000 चा मोफत FASTag रिचार्ज?

NHAI च्या नव्या स्वच्छता मोहिमेनुसार, महामार्ग वापरकर्त्यांना ‘राजमार्ग यात्रा (RajmargYatra)’ अ‍ॅप द्वारे घाणेरडी टॉयलेट्सची माहिती अपलोड करता येईल.
यासाठी वापरकर्त्यांनी खालील तपशील भरावा लागेल:

  • जिओ-टॅग केलेला फोटो (टॉयलेटचा स्पष्ट फोटो)
  • नाव, लोकेशन, वाहन क्रमांक (VRN)
  • मोबाईल क्रमांक

प्रत्येक वाहन क्रमांकासाठी (VRN) ₹1,000 चा FASTag रिचार्ज थेट त्या खात्यावर जमा केला जाईल. मात्र ही रक्कम हस्तांतरणीय नाही आणि रोख स्वरूपात मिळणार नाही.

हेही वाचा – E20 पेट्रोल वापरताय? मग लक्ष द्या! गाड्यांचं मायलेज घटलं, इंजिनमध्ये दोष वाढले!

योजना किती काळ चालणार?

ही योजना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्गांवर लागू राहील. मात्र प्रत्येक वाहन क्रमांकाला या कालावधीत एकदाच बक्षीस मिळू शकते.

कोणती टॉयलेट्स पात्र आहेत?

फक्त त्या टॉयलेट्सना या योजनेत सामावून घेतले जाईल ज्यांचे बांधकाम, संचालन किंवा देखभाल NHAI च्या अखत्यारीत येते. धाबे, पेट्रोल पंप किंवा इतर खासगी ठिकाणांवरील टॉयलेट्स या योजनेत धरले जाणार नाहीत.

 फोटो अपलोडसाठी अटी

  • फक्त स्पष्ट, जिओ-टॅग आणि टाइम-स्टॅम्प केलेले फोटो स्वीकारले जातील.
  • बनावट, जुने किंवा बदललेले फोटो सरळ रद्द केले जातील.
  • एका टॉयलेटवर दिवसात अनेक तक्रारी आल्यास पहिलाच वैध फोटो बक्षीसासाठी ग्राह्य धरला जाईल.

AI आधारित पडताळणी

सर्व नोंदी AI-assisted तपासणी आणि मॅन्युअल व्हॅलिडेशन द्वारे पडताळल्या जाणार आहेत. म्हणजेच कोणतीही फसवणूक रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होईल.

NHAI ची स्वच्छतेसाठी अनोखी संकल्पना

या मोहिमेद्वारे NHAI चे उद्दिष्ट म्हणजे महामार्गांवरील टॉयलेट्सची स्वच्छता राखणे, जनतेचा सहभाग वाढवणे आणि नागरिकांना स्वच्छ भारत मोहिमेत सक्रिय करणे. ‘घाण दाखवा आणि रिचार्ज मिळवा’ हा फॉर्म्युला नागरिकांना या मोहिमेत सामील होण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देईल!

Leave a Comment