
Pulsar NS400Z Launched : देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक बजाज ऑटोने प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अधिकृतपणे आपली सर्वात वजनदार पल्सर ‘Pulsar NS400Z’ विक्रीसाठी लाँच केली आहे. आकर्षक लूक, पॉवरफुल इंजिन आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेल्या या शक्तिशाली पल्सरची सुरुवातीची किंमत 1.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. सध्या, कंपनीने ही प्रास्ताविक किंमतीसह बाजारात लाँच केली आहे, याचा अर्थ नजीकच्या भविष्यात त्याच्या किमती वाढू शकतात.
नवीन बजाज पल्सर NS400Z चे अधिकृत बुकिंग सुरु झाले आहे. त्याचे ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिप द्वारे 5,000 रुपयांच्या बुकिंग रकमेसह बुकिंग करू शकतात. कंपनी लवकरच या बाईकची डिलिव्हरीही सुरू करणार आहे. कंपनीने नवीन पल्सर 4 वेगवेगळ्या रंगांमध्ये सादर केली आहे आणि सर्व रंग व्हेरिएंटसाठी समान किंमत 1.85 लाख रुपये निश्चित केली आहे.
बजाज पल्सर NS400Z ची हेडलाइट अतिशय आकर्षक आणि अनोखी शैलीसह येते. त्याच्या मध्यभागी एलईडी प्रोजेक्टर लाईट देण्यात आला आहे. बाईकला एक आकर्षक डिझाईन देण्यात आली आहे, ज्यामुळे ती एक शार्प लूक देते. त्याचा लूक NS200 ची आठवण करून देणारा आहे. स्पोर्टी रीअर व्ह्यू मिरर, गोल्डन फिनिशसह अप-साइड-डाउन (USD) फ्रंट फोर्क सस्पेंशन आणि इंधन टाकी याला अधिक स्पोर्टी लुक देतात.
हेही वाचा – नवीन Maruti Suzuki Swift 2024 किती मायलेज देईल? लाँचपूर्वी लीक झाली माहिती!
इंजिन: 373 cc
पॉवर: 40Hp
टॉर्क: 35Nm
टॉप स्पीड: 154 किमी/ता
इंधन टाकी: 12 लिटर
Pulsar NS400Z मध्ये कंपनीने 373 cc क्षमतेचे लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे यापूर्वी डोमिनारमध्येही दिसले आहे. हे इंजिन 40hp पॉवर आणि 35Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, जे स्लिप-असिस्ट क्लच सिस्टमसह येते. नवीन पल्सरचा टॉप स्पीड 154 किलोमीटर प्रतितास असल्याचा कंपनीचा दावा आहे.