रॉयल एनफील्डची नवीन ‘गुरिल्ला 450’ बाईक लाँच, सर्वसामान्यांच्या ‘बजेटबाहेर’

WhatsApp Group

Royal Enfield Guerrilla 450 Launched : भारतातील आघाडीची बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अधिकृतपणे आपली नवीन बाईक गुरिल्ला 450 विक्रीसाठी लाँच केली आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित एका मेगा इव्हेंटमध्ये कंपनीने ही नवीन बाईक जागतिक बाजारपेठेत लाँच केली आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या कंपनीने नवीन गुरिल्ला 450 भारतीय बाजारपेठेत 2.39 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली आहे.

ही बाईक 1 ऑगस्ट 2024 पासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. मात्र, कंपनीने अधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. ही बाईक कंपनीच्या वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपद्वारे बुक केली जाऊ शकते. रॉयल एनफिल्डची 450 सीसी सेगमेंटमधील ही दुसरी बाईक आहे. गुरिल्ला 450 ने बार्सिलोना, स्पेन येथे जागतिक पदार्पण केले आहे. ही पाच रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे.

शेरपा 450 प्लॅटफॉर्मवर आधारित या प्रीमियम आधुनिक रोडस्टर बाईकमध्ये कंपनीने 452 सीसी क्षमतेचे सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड शेरपा इंजिन दिले आहे. हे इंजिन 40PS चा पॉवर आणि 40NM टॉर्क जनरेट करते. त्याच्या इंजिनमध्ये वॉटर-कूल्ड सिस्टीम आहे ज्यामध्ये इंटिग्रेटेड वॉटर पंप, ट्विन-पास रेडिएटर आणि इंटर्नल बायपास आहे. या बाईकला 6 गियर्स आहेत, ज्यामध्ये असिस्ट आणि स्लिप क्लच देखील आहे.

हेही वाचा – तीन-चार नाही, तर 15 वर्ष चालतील अशा CNG गाड्या! सर्वात स्वस्त आणि सुरक्षित; पाहा लिस्ट

या बाईकमध्ये स्टेप्ड बेंच सीट, 11-लिटर इंधन टाकी आणि इंटिग्रेटेड टेल लॅम्पसह एलईडी हेडलाइट्स आहेत. यात अपस्वेप्ट सायलेन्सर आणि स्टील ट्विन-स्पार ट्यूबलर फ्रेम आहे. समोरील सस्पेन्शनमध्ये 43 मिमी टेलिस्कोपिक फोर्क आहे आणि मागील बाजूस लिंकेज-प्रकारचे मोनो-शॉक सस्पेंशन आहे. ही मोटरसायकल 17-इंचाच्या पुढील आणि मागील ट्यूबलेस टायर्सवर आधारित आहे, स्टॅबिलिटीसाठी 1440 मिमी चा व्हीलबेस आहे.

Leave a Comment