आता जुनं विसरायचं! रॉयल एन्फिल्डकडून धमाका, मार्केटमध्ये आणले क्रुझर बाईकचे नवे व्हेरिएंट!

WhatsApp Group

Royal Enfield Meteor 350 Aurora Details In Marathi : रॉयल एन्फिल्डने मीटीओर 350 चे नवीन व्हेरिएंट बाजारात आणले आहे. याला ऑरोरा (Aurora) असे नाव दिले आहे. या नव्या व्हेरिएंटला स्टेलर आणि सुपरनोव्हा या व्हेरिएंटमध्ये ठेवले जाईल. ऑरोराची एक्स-शोरूम किंमत ₹219,900 आहे. कंपनीने त्याचे बुकिंग सुरू केले आहे. याशिवाय मीटीओर 350 रेंज देखील अपडेट करण्यात आली आहे. मात्र, कंपनीने आपल्या इंजिनच्या स्पेसिफिकेशनमध्ये कोणताही बदल केला नसून काही फीचर्स जोडले आहेत.

या व्हेरिएंटमध्ये खास काय? (Royal Enfield Meteor 350)

ऑरोरा व्हेरिएंटमध्ये ट्यूब-टाइप टायर, एलईडी हेडलॅम्प, अॅल्युमिनियम स्विच क्यूब्स, डिलक्स टूरिंग सीट आणि ट्रिपर नेव्हिगेशनसह स्पोक रिम्स आहेत. ज्यांना रेट्रो दिसणारी क्रूझर बाईक हवी आहे त्यांच्यासाठी अरोरा व्हेरिएंट आहे.

व्हेरिएंटची किंमत किती? (Meteor 350 Aurora)

मीटीओर 350 ची टॉप-ऑफ-द-लाइन सुपरनोव्हा रेंज आता एक पाऊल वर गेली आहे. ही रेंज प्रीमियम फीचर्ससह LED हेडलॅम्प आणि अॅल्युमिनियम स्विच क्यूब्ससह येईल. त्याची एक्स-शोरूम किंमत 2,29,900 रुपये आहे. स्टेलर रेंजमध्ये आता ट्रिपर नेव्हिगेशन डिव्हाइस स्टँडर्ड फिटमेंट म्हणून आहे. स्टेलर व्हेरिएंटची किंमत 2,15,900 रुपये एक्स-शोरूम आहे, तर फायरबॉलची किंमत 2,05,900 रुपये एक्स-शोरूम आहे.

हेही वाचा – TVS च्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर 10,000 रुपयांची सूट! एवढेच नाही, तर…

काय म्हणाले रॉयल एनफिल्डचे सीईओ? (Royal Enfield News In Marathi)

मीटीओर 350 बद्दल बोलताना रॉयल एनफिल्डचे सीईओ बी गोविंदराजन म्हणाले, ”आम्ही भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मीटीओर 350 च्या उल्लेखनीय यशाचा विचार करतो. ऑरोरा रेंज ही आमच्या रायडर्सच्या समुदायाशी आमच्या सततच्या संभाषणांचा परिणाम आहे.”

Leave a Comment