अभी मजा आएगा ना भिडू! टाटाची हॅरियर आणि सफारी 5 स्टार रेटिंगसह लाँच!

WhatsApp Group

Tata Harrier And Tata Safari Facelift In Marathi : टाटाच्या लोकप्रिय एसयूव्ही सफारी आणि हॅरियरचे नेक्ट जनरेशन मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. टाटा मोटर्सने दोन्ही एसयूव्हीमध्ये समान अपडेटेड डिझेल इंजिन सेटअप दिले आहे, ज्यामुळे त्यांचे मायलेज वाढले आहे. कंपनीचा दावा आहे की दोन्ही कार 16 kmpl पेक्षा जास्त मायलेज देतील. दोन्ही SUV ला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.

दोन्ही गाड्या (Tata Harrier And Tata Safari Facelift) लँड रोव्हरच्या डी8 प्लॅटफॉर्मवरून प्रेरित असलेल्या ओमेगामार्क प्लॅटफॉर्मवर तयार केल्या आहेत. यामध्ये लेव्हल-2 ADAS आणि 7 एअरबॅग्ज सारखी सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. त्यांचे बुकिंग सुरू झाले आहे. 25,000 रुपये टोकन रक्कम भरून खरेदीदार अधिकृत वेबसाइट आणि डीलरशिपवरून बुक करू शकतात.

टाटा हॅरियर आणि सफारी : किंमत

कंपनीने नवीन टाटा सफारी 16.19 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली आहे. तर टाटा हॅरियरची सुरुवातीची किंमत 15.49 लाख रुपये आहे. टाटा सफारी एमजी हेक्टर प्लस, महिंद्रा XUV700, महिंद्रा स्कॉर्पिओ आणि ह्युंदाई अल्काझारशी स्पर्धा करेल. त्याचवेळी टाटा हॅरियरची स्पर्धा महिंद्रा XUV700, एमजी हेक्टर, जीप कंपासशी होईल.

हेही वाचा – Honda CB300R : होंडाची नवीन आणि तगडी बाईक लाँच! जाणून घ्या किंमत

सफारी व्हेरिएंटची किंमत

व्हेरिएंटकिंमत (लाखात)
स्मार्ट मॅन्युअल₹16.19
प्योर मॅन्युअल₹17.69
प्योर+ मॅन्युअल₹19.39
अॅडवेंचर मॅन्युअल₹20.99
अॅडवेंचर + मॅन्युअल₹22.49
अकम्प्लीश्ड मॅन्युअल₹23.99
अकम्प्लीश्ड+ मॅन्युअल₹22.49
ऑटोमॅटिक स्टार्टिंग किंमत₹20.69
डार्क एडिशन स्टार्टिंग किंमत₹20.59

हॅरियर व्हेरिएंटची किंमत

व्हेरिएंटकिंमत (लाखात)
स्मार्ट मॅन्युअल₹15.49
प्योर मॅन्युअल₹16.99
प्योर+ मॅन्युअल₹18.69
अॅडवेंचर मॅन्युअल₹20.19
अॅडवेंचर + मॅन्युअल₹21.69
फियरलेस मॅन्युअल₹22.99
फियरलेस+ मॅन्युअल₹24.49
ऑटोमॅटिक स्टार्टिंग प्राइस₹19.99
डार्क एडिशन स्टार्टिंग प्राइस₹19.99

टाटा हॅरियर आणि सफारी : परफॉरमन्स

पूर्वीप्रमाणे, 2023 टाटा सफारी आणि टाटा हॅरियरमध्ये 2.0-लिटर 4-सिलेंडर डिझेल इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 170 पीएस पॉवर आणि 350 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह ट्यून केलेले आहे.

हॅरियरचे मायलेज

गियरबॉक्स ऑप्शनआत्ताचे हॅरियर मॉडेलहॅरियर फेसलिफ्ट
डीजल MT16.35 kmpl16.80 kmpl
डीजल AT14.60 kmpl14.60 kmpl

सफारीचे मायलेज

गियरबॉक्स ऑप्शनआत्ताचे सफारी मॉडेलसफारी फेसलिफ्ट
डीजल MT16.14 kmpl16.30 kmpl
डीजल AT14.08 kmpl14.50 kmpl

Leave a Comment