टाटा हॅरियर आणि सफारीमध्ये लागणार नवे इंजिन! जाणून घ्या खासियत

WhatsApp Group

Tata Motors New Petrol Engine For SUV : टाटा मोटर्स एक नवीन पेट्रोल इंजिनवर काम करत आहे. टाटाच्या प्रीमियम स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) हॅरियर आणि सफारीमध्ये हे इंजिन वापरले दाईल. हॅरियर आणि सफारी मॉडेल सध्या दोन लिटर डिझेल इंजिनसह येतात. हे इंजिन ऑटो एक्सपोमध्ये दाखवण्यात आले होते आणि ते 1.5L टर्बो GDI पेट्रोल इंजिन आहे.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, इंजिन तयार केले जात असून भविष्यात ते दोन मॉडेलमध्ये सादर केले जाईल. कंपनीने फक्त डिझेल पॉवरट्रेनवर लक्ष केंद्रित केले आहे, कारण दरवर्षी त्या विभागातील सुमारे दोन लाख युनिट्सच्या बाजारपेठेपैकी 80 टक्के डिझेलवर अवलंबून असतात.

हेही वाचा – ओए होए..! नवीन टाटा हॅरियरवर जडलाय अनेकांचा जीव, सर्व म्हणतायत ‘ड्रीम कार’!

कधी येणार?

नुकतेच लाँच केलेल्‍या नवीन हॅरियर आणि सफारी फेसलिफ्टमध्‍ये सध्या 2.0 लीटर डिझेल इंजिन आहे. ते योग्य पद्धतीने विकसित करणे आवश्यक आहे आणि त्याशिवाय उत्पादनास इंजिनसह एकत्रित करणे आवश्यक आहे. चंद्रा म्हणाले की, याशिवाय आम्ही क्षमता वाढविण्याचे काम करत आहोत.

हॅरियर आणि सफारीला उत्तम रेटिंग

टाटा मोटर्सने गेल्या आठवड्यात हॅरियर आणि सफारीची नवीन मॉडेल्स अनुक्रमे 15.49 लाख आणि 16.19 लाख रुपयांपासून सुरू केली आहेत. हॅरियर आणि सफारीच्या या अपग्रेड केलेल्या व्हेरिएंटला ग्लोबल NCAP कडून सर्वोच्च सुरक्षा रेटिंग प्राप्त झाली आहे. Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Suzuki Grand Vitara आणि इतर मध्यम आकाराच्या SUV च्या पेट्रोल प्रकारांची चांगली विक्री लक्षात घेता, शक्य तितक्या लवकर पेट्रोल व्हेरिएंटमध्ये हॅरियर आणि सफारी लाँच करणे टाटासाठी नाईलाज आहे.

Leave a Comment