Tata Sierra To Team India : भारतीय महिला क्रिकेट संघाने अलीकडेच जागतिक क्रिकेट विश्वचषक जिंकत देशाचं नाव जगभर उज्ज्वल केलं. त्यांच्या या ऐतिहासिक विजयाचा गौरव करण्यासाठी टाटा मोटर्सने मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या दिग्गज SUV Tata Sierra चा पहिला ताफा टीमच्या सर्व सदस्यांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. टीममधील प्रत्येक खेळाडूला टॉप-एंड व्हेरिएंट भेट म्हणून मिळणार आहे.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्र म्हणाले, “भारतीय महिला क्रिकेट संघाने अप्रतिम खेळ, चिकाटी आणि निश्चयाच्या जोरावर देशाला अभिमान दिला आहे. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासासाठी आम्ही त्यांना देशातील आणखी एका दंतकथेची भेट देत आहोत – Tata Sierra.”
ही भेट महिला संघाच्या ‘जिद्दी, आवड आणि अदम्य शक्ती’चा सन्मान असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
Legend Meets Legends.
— Tata Motors Cars (@TataMotors_Cars) November 5, 2025
Celebrating the Indian Women’s Cricket Team and their legendary ICC Women’s World Cup performance, Tata Motors Passenger Vehicles proudly presents each member of the team with the Tata Sierra — a bold, versatile, and timeless legend.@TataCompanies pic.twitter.com/RxT4viRa9p
नवीन Tata Sierra
टाटा Sierra 90 च्या दशकात भारतीयांसाठी SUV जीवनशैलीची सुरुवात करणारे मॉडेल होते. आता ते अधिक दमदार, आधुनिक आणि टेक्नॉलॉजीने सुसज्ज रुपात परत येत आहे. नोव्हेंबर 25 रोजी ही SUV अधिकृतपणे लॉन्च होईल.
काय भारी?
- दमदार डिझाइन आणि sculpted बोनट
- ‘SIERRA’ बॅजसह ब्लॅक-आउट फ्रंट ग्रिल
- फ्रंट LED कनेक्टेड लाइट बार
- ड्युअल-टोन अलॉय व्हील्स
- आधुनिक ‘रॅप-अराउंड’ ग्लास लुक
इंटीरियर आणि फीचर्स
- ट्रिपल स्क्रीन सेटअप (डिजिटल क्लस्टर + इन्फोटेनमेंट + को-पॅसेंजर डिस्प्ले)
- Level 2 ADAS
- पॅनोरॅमिक सनरूफ
- व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स
- ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल
- अॅडव्हान्स्ड कनेक्टिव्हिटी फीचर्स
New Tata Sierra Teased in New Red Colour – Confirms Triple Screen Dashboard Setup https://t.co/OBbZ7uZn8q pic.twitter.com/AHYzsw53J9
— RushLane (@rushlane) November 5, 2025
इंजिन आणि किंमत
- सुरुवातीला ICE इंजिन, पुढील वर्षी EV व्हर्जन
- अंदाजित किंमत: ₹13.50 लाख – ₹24 लाख (एक्स-शोरूम)
- स्पर्धक: Mahindra Thar Roxx, MG Hector इत्यादी
का चर्चेत?
कारण पहिल्या Sierra चा मान थेट महिला विश्वविजेत्या संघाला , हा भारतीय मोटरिंग इतिहासात पहिलाच क्षण!