Safest Cars In India : भारतामध्ये कार खरेदी करताना सुरक्षितता हा आज सर्वात महत्त्वाचा घटक ठरत आहे. रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे ग्राहकांचा कल ‘सेफ कार’ कडे झपाट्याने वळला आहे. Global NCAP सारख्या आंतरराष्ट्रीय क्रॅश टेस्टिंग संस्थेने जाहीर केलेल्या रेटिंग्सनुसार अनेक भारतीय कार आता जागतिक पातळीवर सुरक्षिततेच्या कसोटीत अग्रेसर ठरताना दिसत आहेत.
अलीकडील चाचण्यांच्या आधारे India’s Top 5 Safest Cars ची यादी समोर आली आहे. यामध्ये टाटा मोटर्सने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले असून त्यांच्या SUV कार्सने सर्वाधिक गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे.
Tata Safari आणि Harrier – भारतातील सर्वात सुरक्षित कार!
टाटा मोटर्सने सुरक्षेच्या बाबतीत पुन्हा स्वतःचा दबदबा सिद्ध केला आहे. Tata Safari आणि Tata Harrier या दोन्ही SUV गाड्यांनी Global NCAP च्या चाचणीमध्ये सर्वाधिक स्कोअर मिळवला आहे.
दोन्ही मॉडेल्सने अडल्ट व चाइल्ड ऑक्युपंट सेफ्टीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून मजबूत बॉडी स्ट्रक्चर, 6 एअरबॅग्स आणि अॅडव्हान्स्ड सेफ्टी फीचर्समुळे त्या भारतातील क्रमांक 1 सुरक्षित गाड्या ठरल्या आहेत.
Tata Nexon – पुन्हा सुरक्षिततेत टॉपवर
Tata Nexon ने गेल्या काही वर्षांत सुरक्षिततेच्या बाबतीत आपली ओळख कायम ठेवली आहे. अद्ययावत Global NCAP रेटिंगमध्ये तिने पुन्हा दुसरे स्थान पटकावले आहे. या कारमध्ये मजबूत क्रॅश प्रोटेक्शन, स्टेबल केबिन आणि सुधारित सुरक्षा फीचर्स दिले आहेत.
हेही वाचा – भारतामध्ये लाँच झाली दमदार Tata Sierra! तिन्ही इंजिन ऑप्शन्ससह जबरदस्त SUV, बुकिंग सुरू होणार ‘या’ तारखेला!
Nissan Magnite – नवी SUV, थेट 5-स्टार क्लबमध्ये
किफायतशीर SUV म्हणून ओळखली जाणारी Nissan Magnite ने Global NCAP चाचणीत 5-स्टार रेटिंग मिळवत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. या सेगमेंटमध्ये 5-स्टार रेटिंग मिळवणारी ही काही मोजक्या कारपैकी एक आहे. तिची स्ट्रक्चरल मजबुती आणि सेफ्टी फीचर्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
Skoda Kushaq आणि Volkswagen Taigun – जर्मन इंजिनियरिंगची ताकद
Skoda Kushaq आणि Volkswagen Taigun या दोन्ही SUV एकाच प्लॅटफॉर्मवर आधारित असल्याने त्यांची सुरक्षा कामगिरीही जवळपास सारखीच आहे. Global NCAP चाचणीत या दोन्ही कार्सने प्रभावी गुण मिळवत चौथ्या क्रमांकावर आपले स्थान कायम ठेवले आहे.
Volkswagen Virtus आणि Skoda Slavia – सुरक्षितता शोधणाऱ्यांसाठी बेस्ट सेडान्स
भारतामध्ये SUV चा ट्रेंड वाढत असला तरी सेडान सेगमेंटमध्ये VW Virtus आणि Skoda Slavia या दोन्ही कार्स सुरक्षिततेत अग्रस्थानी आहेत. Global NCAP चाचणीत मिळालेल्या चांगल्या रेटिंगमुळे या दोन्ही गाड्यांनी पाचवे स्थान पटकावले आहे.
सुरक्षिततेकडे प्राधान्य
आजच्या काळात कारचा आकार किंवा मायलेज यापेक्षा तिची सुरक्षा किती मजबूत आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. Global NCAP रेटिंग्स ही माहिती देताना महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे पुढील वेळी कार खरेदी करताना नक्कीच क्रॅश टेस्ट रेटिंग तपासावी.