Toyota Car Price Cut : देशात जीएसटीच्या नव्या दरांची अंमलबजावणी 22 सप्टेंबर 2025 पासून होणार असून त्याचा थेट परिणाम वाहन क्षेत्रावर दिसू लागला आहे. ज्या ठिकाणी मोठ्या SUV गाड्यांवर GST वाढवण्यात आली आहे, तिथे दुसरीकडे सेस हटवल्याने ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर Toyota India ने त्यांच्या सर्वच लोकप्रिय मॉडेल्सच्या किमती लक्षणीय कमी करण्याची घोषणा केली आहे.
Toyota Fortuner, Innova Crysta, Innova Hycross, Urban Cruiser Hyryder यासारख्या गाड्यांच्या किंमती आता लाखोंनी कमी होणार आहेत. ही सवलत 22 सप्टेंबरपासून प्रभावी होईल. Toyota कंपनीने याबाबत औपचारिक निवेदन जारी करत सांगितले की, “भारत सरकारच्या ऐतिहासिक कर-सुधारणेचे आम्ही मनापासून स्वागत करतो. नव्या GST दरामुळे ग्राहकांसाठी आमच्या गाड्या अधिक परवडणाऱ्या होतील.”
| मॉडेल | किमतीत कपात |
| Glanza | 85,300 |
| Taisor | 1,11,100 |
| Rumion | 48,700 |
| Hyryder | 65,400 |
| Crysta | 1,80,600 |
| Hycross | 1,15,800 |
| Fortuner | 3,49,000 |
| Legender | 3,34,000 |
| Hilux | 2,52,700 |
| Camry | 1,01,800 |
| Vellfire | 2,78,000 |
Toyota India चे व्हाइस प्रेसिडेंट वरिंदर वाधवा यांनी सांगितले की, “या निर्णयामुळे केवळ ग्राहकांना नाही, तर संपूर्ण ऑटो सेक्टरलाही एक सकारात्मक चालना मिळणार आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढण्याची शक्यता असून, आमच्याकडून ग्राहकांना प्री-बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण किंमती कमी होताच डिलिव्हरीसाठी मागणी वाढेल.”
Toyota च्या या निर्णयामुळे सणासुदीच्या आधी ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः Fortuner सारख्या महागड्या SUV आणि Innova Crysta सारख्या कुटुंबासाठी योग्य मॉडेल्सवरील ही कपात मध्यमवर्गीय खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते.