Toyota कडून धक्का, फॉर्च्युनर महागली! आता मिळेल ‘इतक्या’ लाखांना

WhatsApp Group

Toyota Fortuner Price Hike In Marathi : एकीकडे सणासुदीच्या काळात कार कंपन्या त्यांच्या कारवर भरघोस सूट देत आहेत. कारसोबत अनेक अॅक्सेसरीज मोफत दिल्या जात असताना, सण सुरू होण्यापूर्वीच टोयोटाने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. टोयोटाने आपल्या सर्वात लोकप्रिय एसयूव्ही फॉर्च्युनरच्या सर्व व्हेरिएंटच्या किमती वाढवल्या आहेत. गाड्यांच्या किमती का वाढल्या याबाबत कंपनीने कोणताही खुलासा केला नसला तरी पुरवठा साखळीतील सततच्या अडचणींमुळे ही वाढ करण्यात आल्याचे मानले जात आहे.

काही काळापासून पुरवठा साखळीतील समस्यांमुळे कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कारचा उत्पादन खर्च वाढत आहे. यामुळे जवळपास सर्वच कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत. फॉर्च्युनरच्या कोणत्या व्हेरिएंटवर किंमत किती वाढली ते जाणून घ्या!

किती महाग झालीय फॉर्च्युनर? (Toyota Fortuner Price)

कंपनीने फॉर्च्युनरच्या 4×2 मॉडेलची किंमत 44 हजार रुपयांनी वाढवली आहे. कारच्या 4×4 प्रकारात 70 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. फॉर्च्युनरच्या 4×2 मॅन्युअल पेट्रोल इंजिन व्हेरिएंटच्या किंमतीत 44,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता हे व्हेरिएंट 33.43 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध होईल. याच मॉडेलच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 44 हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून आता त्याची एक्स-शोरूम किंमत 35.02 लाख रुपये झाली आहे.

हेही वाचा – Skoda कंपनीचे फॅन आहात? ‘या’ दोन तगड्या गाड्यांवर मिळतायत भन्नाट ऑफर्स!

डिझेल फॉ़र्च्युनर कितीला मिळेल? (Latest Price Of Toyota Fortuner)

डिझेल इंजिनसह येणार्‍या 4X2 मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 44 हजार रुपयांनी वाढवण्यात आली असून ती आता 35.93 लाख रुपये झाली आहे. त्याच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्येही अशीच वाढ करण्यात आली आहे आणि आता हे मॉडेल 38.21 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध असेल. त्याच वेळी, डिझेल इंजिनसह येणार्‍या 4X4 मॅन्युअल व्हेरिएंटच्या किंमतीत 70 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता या मॉडेलची किंमत 40.03 लाख रुपये झाली आहे. त्याचे ऑटोमॅटिक व्हेरिएंटही तितकेच महाग झाले असून त्याची किंमत आता 42.32 लाख रुपये झाली आहे.

Leave a Comment