पुढच्या 60 दिवसांत SUV मार्केट ‘धडाक्याने’ बदलणार! Seltos, Duster, Safari- Harrier पेट्रोल… काय येतंय नवं?

WhatsApp Group

Upcoming SUVs India : भारताच्या पॅसेंजर वाहन बाजारपेठेत पुढील 60 दिवस सर्वात धडाकेबाज SUV पाहायला मिळणार आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान किमान चार मोठ्या SUV भारतीय रस्त्यांवर उतरणार असून त्यांच्या लाँच तारखाही अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये Kia Seltos, नवीन Renault Duster, तसेच Tata Safari आणि Tata Harrier यांच्या पेट्रोल व्हर्जनचा समावेश आहे.

कोण कोण येतंय? अधिकृत लाँच तारखा

SUV मॉडेललाँच तारीख
Tata Safari Petrol9 डिसेंबर 2025
Tata Harrier Petrol9 डिसेंबर 2025
New-Gen Kia Seltos10 डिसेंबर 2025
New-Gen Renault Duster26 जानेवारी 2026

टाटा Safari आणि Harrier पेट्रोल 

टाटा मोटर्सने अखेर Safari आणि Harrier साठी 1.5-लिटर, चार-सिलिंडर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे इंजिन कंपनीच्या Hyperion Series अंतर्गत विकसित केले गेले असून याचा वापर प्रथम Tata Sierra मध्ये झाला होता.

हे इंजिन जास्त स्मूथ, रिफाइंड परफॉर्मन्स देण्याचे आश्वासन देते. गिअरबॉक्स पर्यायांमध्ये –
✔ DCT Dual-Clutch Automatic
✔ Torque Converter Automatic

या दोन्ही ट्रान्समिशनचा समावेश असेल.

New-Gen Kia Seltos – 10 डिसेंबरला ‘अत्याधुनिक’ अवतारात!

Kia Motors त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय SUV Seltos ला पूर्णपणे नव्या पिढीत आणत आहे. कंपनीने आधीच SUV चे टीझर्स जारी केले आहेत ज्यामध्ये—
नवीन डिझाइन ग्रिल
LED हेडलॅम्प्स आणि DRLs
रिडिझाईन LED टेललॅम्प्स

हे सर्व स्पष्ट दिसत आहेत. नवीन Seltos अधिक अॅग्रेसिव्ह डिझाइन, सुधारित फीचर्स आणि आधुनिक इंटिरियरसह येणार आहे. तसेच पॅनोरॅमिक सनरूफही कन्फर्म झाली आहे.

New-Gen Renault Duster – 26 जानेवारीला पुन्हा ‘कमबॅक’!

भारताची कधी काळी सर्वाधिक विक्री झालेली SUV Renault Duster पुन्हा एकदा भारतीय बाजारात दमदार पुनरागमन करणार आहे.
नवीन Duster आंतरराष्ट्रीय बाजारात आधीच उपलब्ध आहे आणि ती आता भारतात येत आहे—
✔ CMF-B Platform वर आधारित
✔ पूर्णपणे नवीन डिझाईन
✔ आधीपेक्षा अधिक मोठी, स्मार्ट आणि मॉडर्न फीचर्सयुक्त

Duster चे हे नवे रूप भारतीय SUV सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा मोठा धक्का देईल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment