Auto News : टाटा पंच, ह्युंदाई एक्स्टर आणि मारुती फ्रॉन्क्सचा वेटिंग पीरियड माहितीये?

WhatsApp Group

Auto News : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या तीन दमदार SUV च्या वेटिंग पीरियडबद्दल सांगणार आहोत. भारतातील बहुतेक लोकांना सणासुदीच्या काळातच नवीन कार खरेदी करायला आवडते. परंतु, सध्या नवरात्री किंवा दिवाळीपर्यंत या एसयूव्ही खरेदी करणे कठीण आहे कारण त्यांचा वेटिंग पीरियड 7 ते 8 महिन्यांपर्यंत गेला आहे. अशा परिस्थितीत पुढील वर्षी होळीपर्यंत तुम्हाला काही गाडी मिळू शकतील एकदा तुम्ही नवीन कार घेण्याचा निर्णय घेतला की, प्रतीक्षा करणे कठीण आहे. पण, आम्ही ज्या SUV बद्दल बोलणार आहोत त्यांना अनेक लोक पसंत करत आहेत. त्यामुळे त्यांचा वेटिंग पीरियडही मोठा आहे. चला यादी पाहूया.

ह्युंदाई एक्स्टर (Hyundai Exter)

ही SUV यावर्षी जुलैमध्ये भारतात लाँच झाली होती. त्याची सुरुवातीची किंमत 5.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही SUV भारतीय बाजारपेठेतील बजेट फ्रेंडली पर्याय आहे. म्हणूनच बहुतेक लोकांना ती खूप आवडते. या SUV ला लाँच झाल्यापासून 750000 पेक्षा जास्त बुकिंग मिळाले आहेत. मागणी पाहता कंपनी उत्पादन वाढवत आहे. तरीही यासाठीचा वेटिंग पीरियड 8 महिन्यांवर पोहोचला आहे. तथापि, वेटिंग पीरियड डीलरशिपवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकतो. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन एकदा नक्की तपासा.

टाटा पंच (Tata Punch)

टाटाची ही पंच एसयूव्ही भारतात पहिल्यांदा २०२१ मध्ये सादर करण्यात आली. ही SUV लाँच झाल्यापासून लोकांना खूप आवडते. त्यामुळे त्याचा वेटिंग पीरियड अजूनही बराच जास्त आहे. या कारचा वेटिंग पीरियड 6 आठवडे चालणार आहे. सणासुदीच्या काळात हा कालावधी आणखी वाढू शकतो. या SUV ची सुरुवातीची किंमत 5.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही कार 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह येते.

मारुती फ्रॉन्क्स (Maruti Fronx)

मारुतीच्या फ्रॉन्क्सलाही बाजारात मोठी मागणी आहे. या SUV ची किंमत 7.46 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. यासाठी वेटिंग पीरियड सुमारे 24 आठवडे आहे. ही कार 1.2-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1-लीटर टर्बो पेट्रोल बूस्टरजेट इंजिनच्या पर्यायासह येते.

हेही वाचा – Best Automatic Cars Under 7 Lakhs : फक्त 7 लाखांच्या बजेटमध्ये ऑटोमॅटिक गाड्या!

Leave a Comment