
Yamaha Bikes Discount : देशात सणासुदीला सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या हंगामाचा फायदा घेण्यासाठी, यामाहा इंडियाने त्यांच्या काही उत्पादनांवर सवलतीच्या ऑफरही जारी केल्या आहेत. कंपनीने Yamaha FZ सीरीज आणि 125cc Fi Hybrid स्कूटरवर सूट दिली आहे. जर तुम्ही सणासुदीच्या काळात बाईक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर यामाहा इंडियाच्या या ऑफरबद्दल नक्कीच जाणून घ्या. कंपनीने 150cc FZ मॉडेल रेंज आणि 125cc Fi Hybrid स्कूटर ॉवर ऑफर जारी केल्या आहेत. सणासुदीच्या काळात बाईक किंवा स्कूटर घरी आणण्याची ही उत्तम संधी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला लो-डाउन पेमेंटची सुविधाही मिळत आहे.
FZ-S Fi Ver 4.0, FZ-S Fi Ver 3.0, FZ Fi वर Rs 7000 पर्यंतचा कॅशबॅक आणि Rs 7,999 चे डाउन पेमेंट उपलब्ध आहे. तुम्ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Fascino 125 Fi Hybrid आणि RayZR 125 Fi Hybrid वर Rs 4000 पर्यंत कॅशबॅक आणि Rs 2,999 पर्यंतचे डाउन पेमेंट आहे.
Yamaha RayZR 125 Street Rally च्या अपडेटेड आवृत्तीमध्ये, Answer Back आणि LED DRLs चा पर्याय देखील सपोर्ट आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम (दिल्ली) किंमत 98,130 रुपये आहे. या स्कूटरमध्ये 125 cc Fi Blue Core इंजिन आणि हायब्रिड पॉवर असिस्ट आहे.
याशिवाय यात एअर कूल्ड, फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे, जे स्मार्ट मोटर जनरेटर (SMG) सह येते. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर, यात 21 लीटर बूट स्पेस, फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेंशन, साइड स्टँड इंजिन कट-ऑफ स्विच, ऑटोमोबाईल स्टॉप आणि स्टार्ट सिस्टम आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी फीचर्स आहेत.
प्रीमियम मोटरसायकलमध्ये YZF-R3 (321cc), MT-03 (321cc), YZF-R15M (155cc), YZF-R15 V4 (155cc), YZF-R15S V3 (155cc), MT-15 V2 (155cc) यांचा समावेश आहे. याशिवाय FZ मालिकेच्या बाईक्समध्ये FZ-S Fi Ver 4.0 (149cc), FZ-S Fi Ver 3.0 (149cc), FZ Fi (149cc) आणि FZ-X (149cc) यांचा समावेश आहे.
याशिवाय यामाहाच्या स्कूटर पोर्टफोलिओमध्येही वाढ झाली आहे. यामध्ये Aerox 155 आवृत्ती S (155cc), Aerox 155 (155cc), Fascino S 125 Fi Hybrid (125cc), Fascino 125 Fi Hybrid (125cc), RayZR 125 Fi Hybrid (125cc) आणि RayZR Street Rally 125cc (125cc) यांचा समावेश आहे.