जपानी कंपनी यामाहा नेहमीच उत्कृष्ट लूक आणि डिझाइनसह बाईक तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता यामाहाने आपल्या नवीन कॉन्सेप्ट बाईकचे (Yamaha Motoroid 2 Bike In Marathi) पारंपारिक डिझाइन आणि मानके पूर्णपणे मोडून काढली आहेत. एक प्रकारे या नवीन मॉडेलने जुन्या शैलीच्या बाइक्सना आव्हान दिले आहे. या कॉन्सेप्टद्वारे, यामाहा कंपनी मशीन आणि मानव यांच्यात पार्टनरसारखा बाँड निर्माण करण्याची कल्पना करत आहे.
तुम्हाला हँडलबार नसलेली बाईक चालवायची आहे, असे जर तुम्हाला सांगण्यात आले तर बहुधा तुम्हाला तो विनोद वाटेल. पण यामाहाने आपली कॉन्सेप्ट मांडली आहे, ज्याला कंपनीने MOTOROiD 2 असे नाव दिले आहे. या बाईकमध्ये असे अनेक फिचर्स आहेत जे तुम्ही आजपर्यंत कोणत्याही मॉडेलमध्ये पाहिले नसतील.
ही कॉन्सेप्ट बाईक सायन्स फिक्शन चित्रपटांमध्ये दर्शविलेल्या काल्पनिक बाइक्ससारखी दिसते, ज्यांचे भविष्यकालीन डिझाइन आणि तंत्रज्ञान पूर्णपणे अद्वितीय आहे. यात ट्विस्टिंग स्विंगआर्म, एआय फेशियल रिकग्निशन आणि सेल्फ बॅलन्सिंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही बाईक स्वतःचा बॅलन्स राखते आणि स्टँडशिवाय आपल्या जागेवर उभी राहते.
हेही वाचा – डिझेलवर बाईक का चालत नाही? 99% लोकांना माहीत नसेल उत्तर!
याशिवाय यामध्ये फेशियल रेकग्निशन सिस्टीम देखील देण्यात आली आहे, जी बाईकच्या मालकाचा चेहरा ओळखते आणि इतर सर्व फीचर्स अॅक्टिव्ह करते. सध्या ती एक कॉन्सेप्ट म्हणून मांडण्यात आली आहे. मोटोरॉइड 2 ही कॉन्सेप्ट भविष्यात मानव-मशीन इंटरफेस खरोखर कसे दिसेल? या प्रश्नाचे उत्तर असल्याचे कंपनीने सांगितले.

या बाईकमध्ये हँडलबारच्या जागी स्टड हँडग्रिप दिले आहेत. यामुळे बाइकला निश्चितच फ्युचरिस्टिक लुक मिळत असला, तरी त्याबाबतही जोखमीचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामाहाने ने 2017 मध्ये मोटोरॉइडच्या पहिल्या जनरेशनची कॉन्सेप्ट जगासमोर मांडली होती आणि यावेळी जपान मोबिलिटी शोमध्ये दुसऱ्या जनरेशनची मोटोरॉइड कॉन्सेप्ट सादर केली आहे.