Electric Cars India 2025 : भारताची इलेक्ट्रिक क्रांती 2025 मध्ये आणखी वेग घेणार आहे! Tata Motors, Maruti Suzuki, Mahindra आणि BYD सारख्या दिग्गज कंपन्या आपापल्या नव्या इलेक्ट्रिक SUV आणि कार्ससह मार्केटमध्ये जोरदार एन्ट्री करण्यास सज्ज आहेत. जाणून घ्या कोणत्या कार्स 600 किलोमीटरपर्यंतची जबरदस्त रेंज देणार आहेत आणि 2025 मध्ये कोणते EV मॉडेल्स तुमचं मन जिंकणार आहेत.
BYD Atto 2 – परदेशात लोकप्रिय, आता भारतात धमाका
BYD ही चायनीज कंपनी आता भारतातही आपल्या EVs घेऊन धडकणार आहे. GaadiWaadi च्या रिपोर्टनुसार, BYD Atto 2 ही मिड-साइज SUV भारतात टेस्टिंग दरम्यान पाहिली गेली आहे. या गाडीमध्ये 45.1kWh आणि 51.1kWh अशा दोन बॅटरी पर्याय मिळतील. सिंगल चार्जवर ही SUV तब्बल 410 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. भारतात तिची टक्कर Mahindra BE 6 आणि Hyundai Creta EV यांच्यासोबत होणार आहे.

Tata Sierra EV – 627KM ची सुपर रेंज
Tata Motors कडून येणारी Sierra EV ही गाडी Auto Expo 2025 मध्ये चर्चेचा विषय ठरली होती. फेस्टिव सीझनमध्ये ही गाडी बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. यात 65kWh आणि 75kWh बॅटरी ऑप्शन मिळू शकतात. या कारची कमाल रेंज 627 किमी पर्यंत जाऊ शकते, जी आजपर्यंतच्या EVs मध्ये सर्वाधिक आहे.

Maruti Suzuki e-Vitara – कंपनीची पहिली इलेक्ट्रिक SUV
26 ऑगस्ट 2025 ला Maruti Suzuki च्या e-Vitara चा पहिला प्रोडक्शन युनिट रोलआउट होणार आहे. ही इलेक्ट्रिक SUV 61.1kWh आणि 48.9kWh बॅटरी ऑप्शन्ससह येईल. मोठ्या बॅटरीवाला व्हेरियंट 500 किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकतो. ही गाडी Maruti साठी EV सेगमेंटमधील एक मोठा टप्पा ठरणार आहे.

Mahindra XEV 7e – 7 सीटर, 600KM+ रेंज
Mahindra ची XEV 7e ही 7 सीटर इलेक्ट्रिक SUV 2025 च्या शेवटी बाजारात येऊ शकते. 59kWh आणि 79kWh बॅटरी पर्याय मिळतील. या कारची कमाल रेंज 600 किमी पेक्षा जास्त असेल. मोठ्या SUV खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक परफेक्ट चॉईस ठरणार आहे.

2025 मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचं मार्केट प्रचंड वेगाने वाढणार आहे. Tata, Maruti, Mahindra आणि BYD सारख्या कंपन्या आपापल्या पावरफुल गाड्या घेऊन सज्ज आहेत. या कार्स ना फक्त जबरदस्त रेंज आहे, तर त्यांचा लूक, फीचर्स आणि परफॉर्मन्सही जबरदस्त असणार आहे. जर तुम्हीही 2025 मध्ये इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर हे मॉडेल्स नक्की लक्षात ठेवा!