Second Hand Cars Discount : देशभरात नवीन जीएसटी दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत आणि त्यामुळे नवी वाहने स्वस्त होणार, अशी घोषणा आधीच झाली आहे. पण आता, Spinny या सेकंड हँड कार विक्री प्लॅटफॉर्मने यापूर्वीच मोठा निर्णय घेतला असून, त्यांनी जुन्या गाड्यांच्या किंमतीत कपात जाहीर केली आहे.
आता जुनी गाडी खरेदी म्हणजे “नफा”च नफा!
Spinny च्या ग्राहकांना आता सेकंड हँड गाडी खरेदी करताना 2 लाख रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. याशिवाय, गाडी विकणाऱ्यांनाही प्रत्येक कारवर 20000 रुपयांपर्यंत फायदा होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
Spinny ने केली किंमतींची पुनर्रचना
Economic Times Auto च्या रिपोर्टनुसार, Spinny ने स्पष्ट केलं आहे की सेकंड हँड गाड्यांवर सध्या लागू असलेल्या 18% जीएसटीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र ऑटो सेक्टरमध्ये होणाऱ्या बदलांमुळे, पारदर्शक किंमत प्रणाली सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी किंमतींचे “एडजस्टमेंट” केले आहे.
ग्राहकांना तात्काळ फायदा
Spinny च्या मते, ही किंमत कपात ग्राहकांना त्वरित लाभ देईल आणि सेकंड हँड कार मार्केटमधील मागणी टिकवून ठेवण्यास मदत करेल. विशेषतः ज्यांना बजेटमध्ये कार खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
नवीन जीएसटीचा प्रभाव
नवीन जीएसटी दरांनुसार, छोट्या गाड्या व दुचाकींवरील जीएसटी 18% करण्यात आला आहे, तर मोठ्या व लक्झरी गाड्यांवरील कर 40% करण्यात आला आहे. ऑटो पार्ट्सवर देखील जीएसटी 28% वरून 18% करण्यात आला आहे.
कंपनीने काय म्हटलं?
Spinny चे Senior Vice President हनीश यादव यांनी सांगितले, “Spinny मध्ये ग्राहक हीच आमची प्राथमिकता आहे. किंमत असो, गुणवत्ता असो किंवा खरेदी-विक्रीचा अनुभव – आम्ही पारदर्शकता आणि विश्वास यावरच काम करतो.”