JSW Group कडून भारतात मोठी तयारी! घेऊन येणार पहिली SUV, महाराष्ट्रात उत्पादन!

WhatsApp Group

JSW Jetour T2 : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सध्या एसयूव्ही सेगमेंटची मागणी प्रचंड वाढत आहे. हॅचबॅकपासून ते प्रीमियम एसयूव्हीपर्यंत ग्राहकांचा कल झपाट्याने बदलताना दिसतोय. अशातच आता JSW Group कडून भारतात एक मोठी आणि धक्कादायक तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, JSW लवकरच भारतात Jetour T2 Hybrid SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे.

भारतात येणार नवी दमदार SUV

मीडिया रिपोर्ट्सनुसार, JSW आपली पहिली SUV म्हणून JSW Jetour T2 भारतीय बाजारात सादर करू शकते. ही SUV केवळ पेट्रोलच नाही तर Plug-in Hybrid Technology सह लाँच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि फ्युएल-एफिशियंट वाहन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही SUV मोठा पर्याय ठरू शकते.

Hybrid Technology ची खासियत

JSW Jetour T2 SUV Monocoque Chassis वर आधारित असण्याची शक्यता आहे. या SUV मध्ये 26.7 kWh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही SUV तब्बल 139 किलोमीटरची इलेक्ट्रिक रेंज देऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे आकडे पाहता, शहरातील रोजच्या वापरासाठी ही SUV अतिशय किफायतशीर ठरू शकते.

हेही वाचा – 2026 Tata Punch Facelift फक्त ₹5.59 लाखात लाँच! टर्बो इंजिन चर्चेत

चीनच्या Chery सोबत JSW ची भागीदारी

JSW Group ने ही SUV भारतात लाँच करण्यासाठी चीनच्या प्रसिद्ध वाहन निर्माता Chery सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीनंतरच Jetour ब्रँड अंतर्गत ही Plug-in Hybrid SUV भारतात आणली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आणि भारतीय उत्पादन यांचा उत्तम संगम या SUV मध्ये पाहायला मिळू शकतो.

इंजिन किती दमदार असेल?

JSW कडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसली तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार, या SUV मध्ये दोन इंजिन पर्याय मिळू शकतात.

  • 1.5 लीटर Turbo Petrol Engine
    • Power: 154 BHP
    • Torque: 220 Nm
  • 2.0 लीटर Plug-in Hybrid Engine
    • Combined Power: 221 BHP
    • Torque: 390 Nm

हे आकडे पाहता, JSW Jetour T2 ही SUV केवळ मायलेजच नाही तर परफॉर्मन्सच्या बाबतीतही जबरदस्त असणार, हे निश्चित.

महाराष्ट्रात होणार उत्पादन

JSW कडून ही SUV भारतातच तयार केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील संभाजीनगर (औरंगाबाद) येथे नवीन फॅक्टरी सुरू करण्याची तयारी कंपनीकडून सुरू आहे. त्यामुळे ‘Make in Maharashtra’ आणि ‘Make in India’ उपक्रमाला मोठे बळ मिळणार आहे.

भारतीय बाजारात खळबळ?

Hybrid Technology, दमदार इंजिन, आकर्षक डिझाइन आणि JSW सारख्या मोठ्या समूहाचा विश्वास – या सगळ्यांमुळे JSW Jetour T2 Hybrid SUV भारतीय SUV मार्केटमध्ये मोठी खळबळ उडवेल, असा अंदाज ऑटो तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Leave a Comment