Maruti e-Vitara : Maruti Suzuki अखेर आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV e-Vitara चे संपूर्ण फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आणले आहेत. कंपनीचा दावा आहे की ही EV फुल चार्जमध्ये तब्बल 543 किमी रेंज देईल. यामध्ये दोन शक्तिशाली बॅटरी पॅक, लेव्हल-2 ADAS, 7 एअरबॅग्स, 360° कॅमेरा आणि भारत NCAP ची 5-स्टार सुरक्षा रेटिंग अशी अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये मिळतील.
भारतासह तिचे लाँचिंग जानेवारी 2026 मध्ये होणार असून त्याच महिन्यात जपानमध्येही ही SUV लाँच होईल.
दोन बॅटरी पॅक – 49kWh आणि 61kWh (रेंज 543 किमीपर्यंत)
HERATECT-e प्लॅटफॉर्मवर विकसित केलेल्या e-Vitara मध्ये दोन बॅटरी ऑप्शन्स दिले जातील:
- 49kWh (Delta ट्रिम)
- 61kWh (Zeta आणि Alpha ट्रिम्स)
61kWh बॅटरी पॅक फुल चार्जमध्ये 543 किमी धावेल, असा मारुतीचा दावा आहे. ही SUV फ्रंट व्हील ड्राईव्ह (FWD) मध्ये येणार आहे.
The future is electric, and Maruti is finally plugging in! ⚡
— 91Wheels.com (@91wheels) December 2, 2025
Meet the e-Vitara, hitting Indian roads early next year.#cars #automobile #evitara #marutisuzuki #91wheels pic.twitter.com/eNUwWujxrQ
हेही वाचा – देशातील सर्वात महाग नंबर प्लेट पुन्हा विकली जाणार, कारण काय?
DC फास्ट चार्जिंग : फक्त 45 मिनिटांत 80% चार्ज
- DC फास्ट चार्जरवर ही EV केवळ 45 मिनिटांत 80% चार्ज होते.
- ही कार प्रीमियम Nexa डीलरशिपमधून विक्रीस येणार आहे.
BaaS मॉडेल – आता कार बिनाबॅटरीही खरेदी करा!
e-Vitara Battery-as-a-Service (BaaS) सब्सक्रिप्शनसहही उपलब्ध असेल.
याचा अर्थ:
- कस्टमरला कार बिनाबॅटरी स्वस्तात मिळेल
- बॅटरी भाड्याने (subscription) घ्यावी लागेल
- मेंटेनन्स खर्च आणखी कमी
फीचर्स – SUV सेगमेंटमध्ये सर्वात अॅडव्हान्स पर्याय
इंटीरियर आणि टेक्नॉलॉजी
- 26.04 सेमी मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले
- 25.65 सेमी टचस्क्रीन इंफोटेनमेंट
- सनरूफ (फिक्स्ड ग्लास)
- वायरलेस चार्जिंग
- वेंटिलेटेड सीट्स
- 10-वे ड्रायव्हर सीट अॅडजस्टमेंट
- अॅम्बियंट लाईटिंग
- इनफिनिटी ऑडियो सिस्टम
- रियर सीट रिक्लाइन + स्लाइड ऑप्शन
सुरक्षा
- भारत NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग
- 7 एअरबॅग्स
- लेव्हल-2 ADAS
- अॅडॅप्टिव क्रूज कंट्रोल
- लेन कीप असिस्ट
- ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग
- 360° कॅमेरा
- हिल डिसेंट कंट्रोल
- इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक + ऑटो होल्ड
“E for Me” अॅप – EV चार्जिंग आता अधिक सोपे
मारुतीचे उद्दिष्ट आहे की प्रत्येक 5–10 किमी अंतरावर एक चार्जर उपलब्ध असेल. यासाठी कंपनीने “E for Me” अॅप विकसित केले आहे, ज्याद्वारे:
- घरच्या चार्जिंगची सोय
- सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सची लोकेशन
- सहज पेमेंट आणि मॉनिटरिंग
कंपनीकडे सध्या:
- 1300 EV-रेडी सर्विस सेंटर
- 1.5 लाख प्रशिक्षित EV वर्कफोर्स
2000+ चार्जिंग प्वाइंट्स – 2030 पर्यंत 1 लाख चार्जर्सचे लक्ष्य
- भारतभर 2000 पेक्षा जास्त चार्जिंग प्वाइंट्स तयार
- 13 CPO (Charging Point Operators) सोबत भागीदारी
- 2030 पर्यंत 1 लाख चार्जर्स इंस्टॉल करण्याचा प्लॅन
- e-Vitara च्या बॅटरीमध्ये 120 लिथियम-आयन सेल्स
- -30°C ते 60°C तापमानातही स्टेबल परफॉर्मन्स