
OSM Stream City Qik Launched : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी वाढत असल्याचे दिसते. यामध्ये फास्ट चार्जिंग पर्यायांसह येणाऱ्या ईव्हींना सर्वाधिक पसंती दिली जात आहे. दरम्यान आता एक प्रवासी इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर लाँच करण्यात आली, जी 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होते. ही जगातील सर्वात वेगवान चार्जिंग ईव्ही असल्याचा कंपनीचा दावा आहे. ओमेगा सेकी मोबिलिटीने वेगवान चार्ज होणाऱ्या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरसाठी एक्सपोनंट एनर्जीसोबत भागीदारी केली आहे.
3,24,999 किंमत असलेल्या, ‘OSM Stream City Qik’ EV मध्ये एक्सपोनंटच्या रॅपिड चार्जिंग नेटवर्कवर 15 मिनिटांत शून्य ते 100 टक्के चार्ज करण्याची क्षमता आहे, हे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. “रस्त्यावरील डाउनटाइम कमी करून आणि कार्यक्षमता वाढवून, QUIK हे सुनिश्चित करते की प्रत्येक प्रवास आमच्या ड्रायव्हर्ससाठी ठोस आर्थिक फायद्यात अनुवादित होईल,” असे ओमेगा सेकी मोबिलिटीच्या उदय नारंग यांनी सांगितले.
या रिक्षाला 2 लाख किलोमीटर किंवा 5 वर्षे, यापैकी जे आधी असेल त्याची वॉरंटी आहे. एक्सपोनंट एनर्जीने एका निवेदनात म्हटले आहे की, ते चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता आणि हैदराबादमध्ये आपले नेटवर्क विस्तारत असताना, या वर्षी दिल्ली-एनसीआर आणि बेंगळुरूमध्ये 100 चार्जिंग स्टेशन सुरू करेल.
हेही वाचा – टेस्लाच्या गाड्या फॉर्च्युनर आणि इनोव्हापेक्षा स्वस्त असणार! भारतासाठी इलॉन मस्क यांचा प्लॅन
या थ्री-व्हीलरमध्ये 8.8 kWh बॅटरी पॅक आहे आणि एका चार्जवर 126 किमीची सिटी ड्राईव्ह रेंज देते. जानेवारी महिन्यात देशातील प्रवासी तीनचाकी वाहनांची विक्री 53537 युनिट्सच्या पुढे गेली होती.