देशातील पहिली ‘सेल्फ-ड्रायव्हिंग ऑटो रिक्षा’ लाँच, आता आपोआप चालणार!

WhatsApp Group

Self Driving Auto India Swayamgati : भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात एक ऐतिहासिक क्रांती घडली आहे. इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओमेगा सिकी मोबिलिटी (Omega Seiki Mobility – OSM) ने देशातील पहिले सेल्फ-ड्रायव्हिंग (Autonomous) इलेक्ट्रिक ऑटो-रिक्शा लॉन्च केले आहे. या अत्याधुनिक ऑटोचे नाव ‘स्वयंगती’ असे ठेवण्यात आले असून, हे ऑटो पूर्णतः एआय प्रणालीवर आधारित आहे – म्हणजे चालकशिवाय आपोआप चालणारे!

“स्वयंगती” मध्ये काय खास आहे?

‘स्वयंगती’ हे पारंपरिक ऑटोच्या डिझाइनवर आधारित असून दोन व्हर्जन्समध्ये उपलब्ध आहे:

  • पॅसेंजर व्हर्जन: ₹4 लाख (एक्स-शोरूम)
  • कार्गो व्हर्जन: ₹4.15 लाख (एक्स-शोरूम)

बुकिंग सुरू झाले असून, तत्काळ डिलिव्हरीही मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

दमदार बॅटरी, जबरदस्त परफॉर्मन्स

या ऑटोमध्ये 10.3 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जो फक्त एकदा चार्ज केल्यावर 120 किमी रेंज प्रदान करतो. भारतीय रस्ते आणि रहदारीच्या पार्श्वभूमीवर याचे डिझाइन तयार करण्यात आले असून, यामध्ये 200 मिमी ग्राउंड क्लीयरन्स आहे, जे खराब रस्त्यांवरही आरामदायक चाल सुनिश्चित करते.

हेही वाचा – 4 लाखांत SUV-लूक कार? Alto, Tiago, Wagon Rच्या किमती आल्या खाली, पाहा नवे दर!

ही गाडी फक्त इलेक्ट्रिक नाही, तर “स्वतः विचार करणारी” आहे!

‘स्वयंगती’ ही गाडी केवळ इलेक्ट्रिक वाहन नसून, ती एआय-आधारित ऑटोनॉमस टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. यामध्ये खालील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे:

  • LiDAR तंत्रज्ञान (लेसरने वस्तू ओळखण्याची क्षमता)
  • GPS आणि मल्टी-सेंसर नेव्हिगेशन
  • ६ मीटर पर्यंत अडथळे ओळखण्याची क्षमता
  • रिमोट सेफ्टी कंट्रोल्स

ट्रायल फेसेस आणि भविष्यातील योजना

Phase-1 च्या चाचणीत ‘स्वयंगती’ ने 3 किमी प्रवासात 7 स्टॉप्स पार केले, जिथे तिने अडथळ्यांची ओळख, प्रवासी सुरक्षितता आणि मार्गदर्शनाचे उत्तम प्रदर्शन केले. आता कंपनी Phase-2 मध्ये जात आहे, जिथे कंट्रोल्ड कमर्शियल ऑपरेशन्स होतील.

या ऑटोला लवकरच एअरपोर्ट्स, टेक्नॉलॉजी पार्क्स, इंडस्ट्रियल हब्स, गेटेड कम्युनिटीज आणि स्मार्ट सिटीज मध्ये प्रत्यक्षात पाहायला मिळेल.

उत्पादन योजना

OSM चा पुढील दोन वर्षांत 1,500 स्वयंगती ऑटो निर्माण करण्याचा मानस आहे, जेणेकरून वाढती मागणी पूर्ण करता येईल. कंपनीचे चेअरमन उदय नारंग म्हणाले, “स्वयंगती हे केवळ एक उत्पादन नाही, तर भारतीय ट्रान्सपोर्टचं भविष्य आहे. आम्ही फक्त जगाचा पाठलाग करत नाही, तर त्यांना लीड करत आहोत. ही गाडी दाखवते की AI, LiDAR आणि ऑटोनॉमस टेक्नॉलॉजीसारख्या गोष्टी आता भारतात निर्माणही होऊ शकतात आणि भारतीयांसाठी परवडणाऱ्या देखील आहेत.”

Leave a Comment