
Tesla India Launch 2025 : जगभर प्रसिद्ध असलेली एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला कंपनी आता भारतीय बाजारात अधिकृतपणे पदार्पण करत आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या टेस्लाच्या भारतातील शोरूमचा पहिला टप्पा आता 15 जुलै रोजी मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे सुरू होणार आहे.
शोरूमबद्दल माहिती
- टेस्लाचा हा शोरूम 4000 चौरस फूट क्षेत्रफळात उभारण्यात आला आहे.
- हा एक्सपीरियन्स सेंटर म्हणून काम करेल, जिथे ग्राहकांना टेस्ला कार प्रत्यक्ष पाहता आणि अनुभवता येणार आहे.
- टेस्ला भारतात Direct-to-Customer (D2C) मॉडेलद्वारे विक्री करणार आहे.
- विक्रीनंतरची सेवा देण्यासाठी स्थानिक भागीदारांची मदत घेतली जाईल.
भारतात दाखल झाली Model Y इलेक्ट्रिक SUV
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, चीनमधील शांघाय युनिटमधून Model Y रियर-व्हील ड्राइव्ह SUV चे 5 युनिट्स भारतात पोहोचले आहेत. ही कार जगभरातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक SUV पैकी एक आहे.
🚨 BREAKING: Tesla $TSLA is set to launch in India on July 15! 🇮🇳
— Teslasti Basti (@BastianBraun121) July 11, 2025
The streak of great news continues! pic.twitter.com/dvAJOfqqdl
टेस्लाच्या नोकरभरतीची सुरुवात
टेस्लाने अलीकडे मुंबई आणि पुणे येथे विविध पदांसाठी जॉब ओपनिंग्स जाहीर केल्या आहेत. त्यात सेल्स, ऑपरेशन्स, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, AI, IT आणि कस्टमर सपोर्ट यांचा समावेश आहे.
भारत टार्गेट का?
युरोप आणि चीनमधील विक्रीमध्ये घट होत असताना, भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ऑटो मार्केट असल्याने टेस्लासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे टेस्लाने आपला मोर्चा आता भारताकडे वळवला आहे.