
Toyota Urban Cruiser EV : जपानी कार कंपनी टोयोटाने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV अर्बन क्रूझर EV चे अनावरण केले आहे. या इलेक्ट्रिक कारचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. टोयोटाने वर्षभरापूर्वी मारुती ईव्हीएक्सवर आधारित या एसयूव्हीची संकल्पना सादर केली असली आणि आता तिचे उत्पादन तयार मॉडेल लाँच करण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे संकल्पनेतूनच अनेक गोष्टी घेण्यात आल्या आहेत. एकंदरीत ही गाडी मारुती सुझुकीच्या ई विटारासारखीच आहे.
सध्या, अर्बन क्रूझर ईव्ही युरोपियन बाजारपेठेसाठी सादर करण्यात आली आहे. असे मानले जात आहे की कंपनी पुढील वर्षी जानेवारीमध्ये भारत मोबिलिटी एक्सपो 2025 दरम्यान दिल्लीतील प्रेक्षकांसमोर ते प्रदर्शित करेल. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत तो युरोपियन बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जाईल. रिपोर्ट्समध्ये अशी चर्चा आहे की मारुती विटारा इलेक्ट्रिक भारतात लाँच झाल्यानंतर टोयोटा हे मॉडेल इथल्या मार्केटमध्ये लाँच करू शकते.
मुळात मारुती सुझुकी ई विटारावर आधारित, या एसयूव्हीमध्ये त्याच्या मूळ एसयूव्ही सारख्याच अनेक गोष्टी आहेत. यात नवीन डिझाइन केलेले एलईडी डेटाइम रनिंग लाइट (डीआरएल), हेडलॅम्प, अलॉय व्हील्स आणि सुधारित मागील प्रोफाइल आहे. याशिवाय कारमध्ये टोयोटा बॅजिंग देण्यात आले आहे.
Maak kennis met de volledig nieuwe Toyota Urban Cruiser! Deze compacte SUV is volledig elektrisch, heeft een krachtig design en zit vol geavanceerde technologie.
— Toyota Nederland (@ToyotaNL) December 12, 2024
Wat vind jij van dit nieuwe model? 😍
Lees meer via: https://t.co/k8FdC6K6Wb pic.twitter.com/v4nzw9KUvv
जर आपण साइड प्रोफाईल बघितले, तर ते मुख्यत्वे संकल्पना मॉडेलपासून प्रेरित आहे. यात ब्लॅक प्लॅस्टिक क्लेडिंग देण्यात आले आहे जे SUV चे शरीर पूर्णपणे कव्हर करते. हे कारला थोडा स्पोर्टी टच देण्यास मदत करते. कंपनी ही SUV 18-इंच किंवा 19-इंच एरो-ऑप्टिमाइज्ड व्हीलसह देईल. ई विटाराप्रमाणे, अर्बन क्रूझर ईव्ही ला C-पिलरमध्ये मागील दरवाजाचे हँडल मिळतात.
संकल्पना ते प्रॉडक्शन रेडी मॉडेल असा प्रवास करताना ही एसयूव्ही थोडी लहान झाली आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची एकूण लांबी 4,285 मिमी, रुंदी 1,800 मिमी, उंची 1,640 मिमी आहे. संकल्पना मॉडेलच्या तुलनेत, त्याची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 15 मिमी आणि 20 मिमीने कमी केली आहे. तथापि, त्याच्या उंचीमध्ये 20 मिमीची वाढ दिसून आली आहे. याचा व्हीलबेस 2,700 मिमी आहे. ही गाडी ई विटारापेक्षा थोडी मोठी आहे.
The 2025 Toyota Urban Cruiser makes its debut in the Old Continent with bZ4X-inspired styling, a 10.25-inch digital instrument cluster, a large 10.1-inch center touchscreen display, 49- and 61-kWh lithium-iron-phosphate battery packs, available 4WD, as well as up to 181 hp. #BEVs pic.twitter.com/Z7MLraOtdK
— GearheadCole ⚙️ (@cole_marzen) December 13, 2024
लांबी 4,285 मिमी
रुंदी 1,800 मिमी
उंची 1,640 मिमी
व्हीलबेस 2,700 मिमी
कार केबिन
अर्बन क्रूझर ईव्हीच्या केबिनमध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले आहेत. यात “स्क्विर्कल” स्टीयरिंग व्हीलसह स्टिरिओसाठी एक भौतिक व्हॉल्यूम नॉब आहे. यात 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ड्रायव्हरच्या समोर 10.3-इंच डिजिटल गेज क्लस्टर आहे. ज्यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले कनेक्टिव्हिटीची सुविधा मिळते.
यामध्ये ऑटो होल्ड, ड्राईव्ह मोड, सिंगल-झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देण्यात आले आहेत. याशिवाय पॉवर्ड ड्रायव्हर सीट ॲडजस्ट, जेबीएल ऑडिओ सिस्टीम आणि सनरूफ देण्यात आले आहेत. कंपनीने पुष्टी केली आहे की ईव्हीच्या मागील सीट्स स्लाइडिंग आणि रिक्लाइनिंग फंक्शन्स तसेच 40:20:40 स्प्लिट-फोल्डिंग फंक्शनसह येतील. म्हणजेच केबिनमध्ये आरामाची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
पॉवरट्रेन पर्याय
टोयोटाचे म्हणणे आहे की अर्बन क्रूझर दोन पॉवरट्रेन कॉन्फिगरेशनसह ऑफर केली जाईल. ही SUV 49kWh आणि 61kWh क्षमतेच्या लिथियम-आयरन फॉस्फेट (LFP) सेलच्या दोन बॅटरी पॅकसह सादर करण्यात आली आहे. लहान बॅटरीसह व्हेरिएंटमध्ये फ्रंट एक्सल-माउंट इलेक्ट्रिक मोटर आहे. जे 144hp पॉवर आणि 189Nm टॉर्क जनरेट करते. तर मोठ्या बॅटरीसह व्हेरिएंटची मोटर 174hp पॉवर आणि 189Nm टॉर्क जनरेट करते.
टोयोटाने अद्याप पुष्टी केलेली नाही की कंपनी भारतीय बाजारात आपले पहिले इलेक्ट्रिक मॉडेल कधी लाँच करेल. परंतु पुढील वर्षाच्या अखेरीस अर्बन क्रूझर ईव्ही भारतीय बाजारपेठेत सादर केली जाण्याची शक्यता आहे. हे जागतिक मॉडेल असल्याने भारतीय बाजाराच्या परिस्थितीनुसार त्यात काही बदल होण्याची शक्यता आहे.