
Helmet : केंद्र सरकार आता दुचाकीस्वारांच्या सुरक्षेबाबत पूर्वीपेक्षा अधिक जागरूक झाले आहे. ही सुरक्षा लक्षात घेऊन केंद्र सरकारने 162 हेल्मेट उत्पादक कंपन्यांवर बंदी घातली आहे. या सर्व कंपन्या बीएसआय (ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स इंडिया) च्या मानकांनुसार हेल्मेट तयार करत नव्हत्या. त्यामुळे सरकारने या कंपन्यांवर कारवाई केली आहे.
रस्त्याच्या कडेला हेल्मेट विकताना तुम्ही पाहिलं असेल. या हेल्मेटवर नामांकित कंपन्यांची नावे आहेत, परंतु हे हेल्मेट बीएसआय मानकांची पूर्तता करत नाहीत. कारण हे हेल्मेट डुप्लिकेट असून नामांकित कंपन्यांची नावे चोरून लोकांची दिशाभूल करतात. अशा परिस्थितीत सरकारने आता या हेल्मेट उत्पादक कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे.
देशातील सर्वात मोठी हेल्मेट उत्पादक कंपनी असलेल्या स्टीलबर्डच्या कारखान्यात जाऊन तुम्ही हेल्मेट तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहू शकता. हेल्मेट बनवण्याची सुरुवात त्याच्या डिझाईनपासून होते. कोणतीही कंपनी सर्वप्रथम वापरकर्त्याची सोय लक्षात घेऊन हेल्मेट डिझाईन करते.
हेही वाचा – Diwali 2024 : देशातील नंबर 1 बाईक कंपनी देतेय छप्परफाड ऑफर्स! जाणून घ्या
हेल्मेटचे डिझाईन निश्चित झाल्यावर हेल्मेटच्या आत बसवायचे थर्माकोल तयार केले जाते. हे इतके मजबूत असते की तुम्ही ते उडी मारून किंवा हाताने तोडू शकत नाही. हे हेल्मेट आकाराचे थर्माकोल उच्च दाबाच्या मशिनद्वारे तयार केले जाते.
हेल्मेटचे डिझाईन आणि थर्माकोलचा आकार निश्चित झाल्यानंतर हेल्मेटची बॉडी रंगीत करून त्यावर ग्राफिक्स लावले जातात. यानंतर कर्मचाऱ्यांकडून हेल्मेट एकत्र केले जाते. ज्यामध्ये फोम, कापड आणि बकल (हेल्मेट घट्ट करण्यासाठी) लावले जातात.