
डस्टर ही रेनॉल्टची अतिशय लोकप्रिय कार आहे. युरोपियन बाजारपेठेत रेनॉल्टने नवीन डस्टर (New Renault Duster 2024) आणली आहे. नव्या जनरेशनच्या या डस्टरमध्ये पूर्णपणे नवीन डिझाइन, आलिशान इंटीरियर, उत्तम फीचर्स आणि अपग्रेडेड इंजिन आहे. ही डस्टर रेनॉल्ट-निसानच्या CMF-B प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलीय.
जुन्या रेनॉल्ट डस्टरची शैली कायम ठेवली असली, तरी नवीन डस्टर आधुनिक स्टाइलसह अपडेट करण्यात आली आहे. नवीन मॉडेल जुन्या मॉडेलपेक्षा थोडी लांब असेल आणि थोडी स्पोर्टी लूकमध्ये येईल. रेनॉल्टप्रमाणे, निस्सानदेखील डस्टरचे स्वतःचे व्हर्जन आणणार आहे, जी भारतासह इतर जागतिक बाजारपेठांमध्ये लॉन्च केली जाईल.

नवीन रेनॉल्ट डस्टरची डिझाइन
डस्टरच्या पुढील भागात Y-आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, क्रोम एलिमेंट्स आणि सिग्नेचर ग्रिल आहे. कारच्या मागील भागात Y आकाराचे LED DRL देखील देण्यात आले आहेत. कारमध्ये नवीन डिझाइन अलॉय व्हील, ड्युअल टोन बंपर आणि इंटिग्रेटेड ब्रेक लाईट देखील आहेत.

हेही वाचा – स्वत:च्या बाईकवर प्रेम करत असाल, तर क्लच प्लेटचीही काळजी घ्या!
नवीन डस्टरमध्ये 472 लीटरची बूट स्पेस आहे. त्याच्या रूफ रॅकमध्ये 80 किलोपर्यंत सामान ठेवता येते. ही कार 4343 मिमी लांब, 1656 मिमी उंच आणि तिचा व्हीलबेस 2657 मिमी आहे. ही कार जुन्या मॉडेलपेक्षा थोडी मोठी आहे. नवीन डस्टरचे इंटीरियर पूर्णपणे अपडेट करण्यात आले आहे. यात नवीन डिझाइन केलेले डॅशबोर्ड, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, बेस मॉडेलमधील सेमी-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट, क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्स आहेत.

नवीन रेनॉल्ट डस्टर इंजिन
नवीन डस्टरमध्ये 1.6 लिटर, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे दोन इलेक्ट्रिक मोटर्ससह येते. त्याचे पॉवर आउटपुट 140bhp असेल. कारमध्ये 1.2kWh बॅटरी पॅक आणि हायब्रीड सिस्टमसह रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे. याशिवाय, कार 1.2 लीटर, 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह देखील येते, जी 130 bhp पॉवर जनरेट करेल. सोबत 6-स्पीड गिअरबॉक्स दिला जाईल. ही कार ऑटो, स्नो, मड/सँड, ऑफ रॉड आणि इको अशा 5 ड्रायव्हिंग मोडसह येते. नवीन डस्टर 2025 मध्ये भारतात येईल अशी अपेक्षा आहे.