‘Jimny पेक्षा भारी?’ भारतात येण्याआधीच नवीन Renault Duster ने ऑफ-रोडिंगमध्ये उडवली खळबळ, VIDEO पाहून सगळेच थक्क!

WhatsApp Group

Renault Duster 2026 : भारतामध्ये SUV प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, नवीन जनरेशन Renault Duster पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. 26 जानेवारी 2026 रोजी भारतात लाँच होण्याची शक्यता असलेल्या या SUV ने अधिकृत पदार्पणाआधीच ऑफ-रोडिंगमध्ये कमाल करून दाखवली आहे. विशेष म्हणजे, ही चाचणी भारतात नव्हे, तर ऑस्ट्रेलियामध्ये एका नामांकित ऑटोमोटिव्ह मीडिया संस्थेद्वारे करण्यात आली आहे.

Renault Duster ही भारतात मिड-साइज SUV सेगमेंट सुरू करणारी पहिली कार मानली जाते. आज जिथे Creta, Seltos, Grand Vitara, Scorpio-N यांसारख्या गाड्यांची गर्दी आहे, तिथे नवीन Duster पुन्हा एकदा ‘खरी SUV’ काय असते हे दाखवू शकते, अशी चिन्हे दिसत आहेत.

ऑफ-रोडवर उतरली नवीन Renault Duster

YouTube वरील CarExpert या प्रसिद्ध चॅनेलवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये नवीन Renault Duster चे 4×2 आणि 4×4 असे दोन अवतार पाहायला मिळतात. सुरुवातीला 4×2 व्हेरिएंटची रस्त्यावर चाचणी घेण्यात आली असली, तरी खरी उत्सुकता होती ती 4×4 ऑफ-रोड स्पेशल व्हर्जनची. ही SUV विशेषतः ऑस्ट्रेलियन मार्केटसाठी तयार करण्यात आलेली कॉन्सेप्ट कार असून, तिच्यात खालील जबरदस्त वैशिष्ट्ये आहेत –

  • 212 mm ग्राउंड क्लीअरन्स
  • उत्तम Approach आणि Departure Angles
  • खास Off-Road Tyres
  • आफ्टरमार्केट Adventure Kit
  • पूर्णपणे कार्यक्षम 4×4 ड्राइव्ह सिस्टम

ट्रॅक्शन कंट्रोलची कसोटी – Duster पास!

ऑफ-रोड चाचणीची सुरुवात ट्रॅक्शन कंट्रोल टेस्ट पासून झाली. या चाचणीत ड्रायव्हर साईडचा मागील टायर हवेत लटकवण्यात आला होता. अशा परिस्थितीत बहुतांश SUV गडबडतात, मात्र Renault Duster ने ही चाचणी अगदी सहज पास केली.

पुन्हा एकदा 4×4 मोडमध्ये हीच चाचणी घेण्यात आली आणि तेव्हाही Duster ने कोणतीही अडचण न दाखवता आपली ताकद सिद्ध केली.

यानंतर SUV समोर ठेवण्यात आला एक अत्यंत उभा चढ. सुरुवातीला काही अयशस्वी प्रयत्न झाले, मात्र ड्रायव्हरने योग्य वेळी वेग वाढवताच Duster ने सहजपणे चढ पार केला. यानंतर Hill Descent Control ची चाचणी घेण्यात आली. उतारावर नियंत्रण ठेवताना ही प्रणाली अत्यंत प्रभावीपणे काम करत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा – Video : बंगळुरूमध्ये मॉडिफाइड कारचा थरार, RTO ने ठोठावला तब्बल ₹1.25 लाखांचा दंड!

शेवटची चाचणी होती खडकाळ रस्त्यावरून ड्राइव्ह करण्याची, जिथेही नवीन Duster ने अपेक्षेप्रमाणे स्थिरता आणि आत्मविश्वास दाखवला.

Jimny शी तुलना – खरी SUV कोण?

या संपूर्ण ऑफ-रोड अनुभवाबाबत बोलताना, टेस्ट करणाऱ्या तज्ज्ञांनी स्पष्टपणे सांगितले की नवीन Renault Duster काही बाबतीत Suzuki Jimny इतकीच सक्षम वाटते.
Monocoque प्लॅटफॉर्म असूनही Duster ने जे प्रदर्शन केले आहे, ते अनेक तथाकथित ‘Soft-Roaders’ पेक्षा खूपच पुढचे आहे.

Leave a Comment