6 वर्षांनंतर नवीन अवतारात लाँच झाली Renault Triber! जाणून घ्या नेमकं काय बदललं?

WhatsApp Group

Renault Triber 2025 Facelift : Renault ने आपल्या लोकप्रिय MPV कार Triber चे नवीन फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच केले आहे. तब्बल 6 वर्षांनंतर आलेल्या या अपडेटमध्ये अनेक खास फीचर्स, आकर्षक डिझाईन आणि प्रीमियम इंटीरियर्स पाहायला मिळतात. मात्र, इंजिनमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

इंजिन जसं होतं तसंच!

नवीन Triber मध्ये पुन्हा एकदा 1.0 लीटर नैचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनच देण्यात आलं आहे, जे 72hp ची पावर तयार करतं. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्यायासह येतं.

बाह्य डिझाईनमध्ये झाले ‘हे’ मेजर अपडेट्स

नवीन Triber अधिक प्रीमियम आणि आधुनिक दिसते. यात आता

  • नवीन फ्रंट बम्पर
  • आकर्षक LED DRLs
  • नव्या स्लॅट्ससह स्टायलिश ग्रिल
  • नवीन Renault लोगो
  • 15 इंचांचे नविन अलॉय व्हील्स
  • कनेक्टेड टेललाइट्स
  • आणि Triber बॅजिंग खालील बाजूस मिळते.

इंटीरियरमध्ये टेक आणि लक्झरीचा फुल टच!

नवीन Triber चं इंटीरियर आता अधिक प्रीमियम वाटतं. यात

  • 8 इंचाची फ्लोटिंग टचस्क्रीन
  • वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट
  • क्रूझ कंट्रोल
  • ऑटो फोल्डिंग मिरर (Welcome आणि Goodbye सीनसह)
  • स्टँडर्ड 6 एअरबॅग्स
  • फ्रंट पार्किंग सेंसर्स
  • नवीन डॅशबोर्ड आणि कलर अपहोल्स्ट्री दिली आहे.

नवीन Triber ची किंमत आणि व्हेरिएंट्स

Triber आता 5, 6 आणि 7-सीटर लेआउटमध्ये उपलब्ध आहे.
600 लिटरहून अधिक बूट स्पेस (5 सीटरमध्ये), रियर एसी वेंट्स यांसारखी वैशिष्ट्ये अजूनही आहेत.

किंमत: ₹6.2 लाख पासून ₹9.16 लाख पर्यंत (एक्स-शोरूम)
भारतातील सर्वात किफायतशीर कॉम्पॅक्ट MPV म्हणून Triber अजूनही बेस्ट ऑप्शन ठरते.

काय राहिलंय कमी?

डिझाईन आणि फीचर्समध्ये मोठे अपडेट्स झाले असले तरी, इंजिन आधीसारखंच आहे.
Turbo पेट्रोल इंजिनचा पर्याय अद्यापही नाही, जसा Kiger मध्येही नाही.

Leave a Comment