Porsche Cayenne Electric India : भारतामध्ये आलिशान SUV सेगमेंटमध्ये क्रांती घडवत Porsche ने आपल्या नवीन ‘Porsche Cayenne Electric’ चे लाँचिंग केले आहे. किंमत 1.76 कोटी रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होत असून, ही EV दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे – Cayenne Electric आणि Cayenne Turbo Electric. बुकिंग अधिकृतरित्या सुरू झाले असून, डिलिव्हरी 2026 च्या दुसऱ्या सहामाहीपासून सुरु होणार आहे.
भारतात ही इलेक्ट्रिक सुपर SUV आता थेट प्रतिस्पर्धी ठरणार आहे – BMW iX, Audi Q8 e-tron आणि Lotus Eletre.
तगडी पॉवर, थरारक वेग
दोन्ही व्हेरिएंटमध्ये 113kWh बॅटरी पॅक आणि ड्युअल-मोटर ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम स्टँडर्ड मिळते.
खरा पॉवरमशीन ठरतो Turbo Electric व्हेरिएंट, जो देते:
- 1,156hp पॉवर
- 1,150Nm टॉर्क
- 0-100kmph फक्त 2.5 सेकंदात
- टॉप स्पीड 260kmph
- वन-चार्ज रेंज: 623km
स्टँडर्ड Cayenne Electric देखील दमदार:
- 408hp
- 835Nm
- 0-100kmph: 4.8 सेकंद
- रेंज: 642km (जास्त दावा)
ही Porsche ची पहिली SUV आहे जी 11kW वायरलेस चार्जिंगचा पर्याय देते.
डिझाइन आणि फीचर्स, परफेक्शनचा नमुना
पेट्रोल Cayenne प्रमाणेच दिसणाऱ्या या SUV मध्ये EV डिझाइन टच दिले आहेत:
- क्लोज्ड ग्रिल
- 20-22 inch अलॉय व्हील्स
- अॅडॅप्टिव्ह एअर सस्पेन्शन
- रिअर-अॅक्सल स्टीअरिंग (ऑप्शनल)
केबिनमध्ये मिळते:
- 14.5-inch कर्व्ड टचस्क्रीन
- 14.9-inch पॅसेंजर डिस्प्ले (ऑप्शनल)
- AR हेड-अप डिस्प्ले
- व्हेंटिलेटेड सीट्स
- पॅनोरामिक सनरूफ
- प्रीमियम साउंड सिस्टिम
साइज & स्पेस
- लांबी – 4,985mm
- रुंदी – 1,980mm
- उंची – 1,674mm
- व्हीलबेस – 3,023mm (130mm अधिक)
- बूट – 781L (1,588L पर्यंत) + 90L फ्रंक
रिअरमध्ये फुल-विड्थ LED लाइटबार व इल्युमिनेटेड Porsche लोगो लक्झरी फील वाढवतात.