
TVS iQube Discount Info In Marathi : टीव्हीएस मोटर इंडियाने आपल्या ग्राहकांना सणासुदीच्या काळात एक मोठी भेट दिली आहे. टीव्हीएस मोटरने भारतात विकल्या जाणार्या त्यांची एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर, TVS iQube वर मोठ्या प्रमाणात (TVS Electric Scooter) सूट दिली आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवर सणासुदीच्या काळात दिलेल्या ऑफर्सची माहिती दिली आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरवर 10,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. यासोबतच कंपनी कॅशबॅक देखील देत आहे.
जर तुम्ही सणासुदीच्या काळात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही स्कूटर तुमच्या विशलिस्टमध्ये ठेवू शकता. ओला इलेक्ट्रिक स्कूटर्स नंतर, टीव्हीएस इलेक्ट्रिक स्कूटर ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त विक्री होणारी स्कूटर आहे.
हेही वाचा – ‘ही’ गाडी म्हणजे रोल्स रॉयसची डिट्टो कॉपी! चीनने आणले इलेक्ट्रिक व्हर्जन

येथे पाहा ऑफर (TVS iQube Offer)
कंपनीच्या वेबसाइटनुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरवर 10,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. याशिवाय कंपनी 7500 रुपयांपर्यंत कॅशबॅकही देत आहे. इतर ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर नो कॉस्ट EMI सह देखील खरेदी करू शकता. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरवर 3 वर्षे किंवा 50000 किलोमीटरची वॉरंटीही देत आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरबाबत आणखी एक मोठे अपडेट म्हणजे आतापर्यंत 2 लाख लोकांनी या इलेक्ट्रिक स्कूटरला पसंती दिली आहे. कंपनीने लॉन्च केल्यापासून या इलेक्ट्रिक स्कूटरच्या 2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. ही स्कूटर 2020 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. कंपनीने अवघ्या 10 महिन्यांत 1 लाख युनिट्सची विक्री केली होती.
ही स्कूटर बूक करण्यासाठी येेथे क्लिक करा!