EV Battery Life : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती, त्यावर सरकारच्या सबसिडी योजना आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान यामुळे ग्राहकांचा कल ईव्हीकडे वाढतो आहे. पण ईव्ही खरेदी करताना सर्वात मोठा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण होतो – EV बॅटरी किती काळ टिकते आणि खराब झाल्यावर तिचं पुढे काय होतं?
कारण EV ची एकूण किंमत पाहिल्यास जवळपास 40 टक्के खर्च केवळ बॅटरीवर होतो. त्यामुळे बॅटरीची वास्तविक आयुष्य किती असते आणि तिचा दुसऱ्या टप्प्यात कसा उपयोग होतो, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
EV बॅटरी किती वर्षे टिकते?
बहुतेक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियम-आयन (Lithium-ion) बॅटरींचा वापर होतो. या बॅटरींचे आयुष्य अनेक घटकांवर अवलंबून असते, पण सरासरी 6 ते 8 वर्षे ही बॅटरी नीट काम करू शकते. काही प्रीमियम EV मॉडेलमध्ये ही बॅटरी 10 वर्षांपर्यंत टिकते.
कंपन्या आपल्या बॅटरीवर 7 ते 8 वर्षांपर्यंत वॉरंटी देतात, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास टिकून राहतो. म्हणजेच या काळात बॅटरी 70-80% क्षमतेने काम करत राहते.
बॅटरीची क्षमता का कमी होते?
ही प्रक्रिया Battery Degradation म्हणून ओळखली जाते. सुरुवातीची 2-3 वर्षे बॅटरी स्थिर कार्यक्षमता देते. पण त्यानंतर प्रत्येक वर्षी 2-3% क्षमतेने घट होते. साधारणतः 8 वर्षांनंतर EV बॅटरी 70% कार्यक्षमतेवर येते. म्हणजे जर नवीन EV एकदा चार्ज केल्यावर 400 किमी जात असेल, तर 8 वर्षांनी ती फक्त 280-300 किमीच चालू शकते.
EV बॅटरी खराब झाल्यावर काय होते?
हेच सर्वात रोचक आहे! EV बॅटरी पूर्णतः निकामी होत नाही. 70% कार्यक्षमतेसह ती अजूनही उपयोगी ठरते आणि “सेकंड-लाइफ युटिलायझेशन” मध्ये वापरली जाते.
- स्टेशनरी एनर्जी स्टोरेज
- घर, ऑफिस किंवा फॅक्टरीतील वीज साठवणुकीसाठी
- सोलर पॅनलद्वारे निर्माण होणारी वीज साठवण्यासाठी
- बॅकअप पॉवर सप्लायसाठी
- ग्रामीण भागात मिनी-ग्रिड तयार करण्यासाठी
- इन्व्हर्टर आणि UPS मध्ये
EV बॅटरीचे छोटे मॉड्युल्स बनवून ते इन्व्हर्टरमध्ये लावले जातात. अनेक स्टार्टअप्स या तंत्रज्ञानावर काम करत आहेत.
2. औद्योगिक वापर
मोठ्या फॅक्टरीमध्ये या बॅटरींचा वापर मशीनरीसाठी आणि लोड बॅलन्सिंगसाठी होतो.
EV बॅटरीचं आयुष्य वाढवण्यासाठी टिप्स
- फास्ट चार्जिंग टाळा
- बॅटरी 20% ते 80% चार्जमध्ये ठेवा
- फार गरम किंवा थंड हवामानात चार्जिंग टाळा
- गाडी दीर्घकाळ न वापरताना बॅटरी पूर्ण discharge होऊ देऊ नका
सरकार आणि इंडस्ट्रीचा पुढाकार
भारत सरकारने EV बॅटरींच्या रीसायकलिंग आणि सेकंड-लाइफ वापरासाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. अनेक कंपन्या आता Battery Recycling क्षेत्रात उतरत आहेत. हे पुढे भव्य उद्योग होणार असून, यामुळे ई-वेस्ट कमी होईल आणि नवीन बॅटरींचा खर्चही कमी होईल.