देशातील नंबर-1 कार झाली 87 हजाराने स्वस्त! मायलेज 30km, सेफ्टी 5-स्टार!

WhatsApp Group

Maruti Dzire Price Drop : 22 सप्टेंबरपासून मारुती सुझुकी डिजायरची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली आहे. GST 2.0 लागू झाल्यानंतर ही सेडान कार ग्राहकांसाठी अधिक परवडणारी झाली आहे. आता डिजायरवर 28% GST व 1% सेसऐवजी फक्त 18% GST लागू केला गेला असून यामुळे ग्राहकांना थेट ₹87,000 पर्यंतचा लाभ मिळणार आहे. ही कपात आजपासून (22 सप्टेंबर 2025) लागू झाली आहे.

नवीन किंमती (Variant Wise)

व्हेरिएंटनवीन किंमत (₹)
LXI 1.2L 5MT6,25,674
VXI 1.2L 5MT7,17,147
ZXI 1.2L 5MT8,17,767
ZXI+ 1.2L 5MT8,86,372
VXI 1.2L AGS7,62,884
ZXI 1.2L AGS8,63,504
ZXI+ 1.2L AGS9,32,109
VXI CNG 1.2L 5MT8,04,047
ZXI CNG 1.2L 5MT9,04,667

डिझाईन आणि एक्सटीरियर फीचर्स

मारुती डिजायरमध्ये स्टायलिश मोठी फ्रंट ग्रिल, स्लिक एलईडी डीआरएल, आकर्षक एलईडी टेल लॅम्प आणि नवा 15-इंच ड्युअल टोन अलॉय व्हील देण्यात आला आहे.

हेही वाचा – EV बॅटरी फक्त 8 वर्षच चालते? खराब झाल्यावरही वापरता येते? जाणून घ्या

फिचर्सचा ‘फुल्ल’ धमाका

  • 9-इंच टचस्क्रीन डिस्प्ले
  • वायरलेस फोन चार्जर
  • क्रूझ कंट्रोल
  • भारतातील पहिली सब-कॉम्पॅक्ट सेडान जिच्यात सिंगल पॅन सनरूफ आहे.

सुरक्षेची हमी – 5-स्टार सेफ्टी!

मारुती डिजायरला ग्लोबल NCAP कडून फॅमिली सेफ्टीसाठी 5-स्टार रेटिंग मिळाली आहे.
यात 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोलसारखे अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत.

मायलेजचा राजा – 30 किमीच्या पुढे!

  • मॅन्युअल ट्रान्समिशन: 24.79 kmpl
  • ऑटोमॅटिक ट्रान्समिशन: 25.71 kmpl
  • CNG वर्जन: 30 km/kg पेक्षा जास्त

पॉवरट्रेन – दमदार इंजिन

1.2 लीटर, 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन

  • पॉवर: 81.58 bhp
  • टॉर्क: 111.7 Nm
  • CNG ऑप्शनही उपलब्ध

Leave a Comment