Mahindra XEV 9S : भारताच्या ऑटोमोबाईल जगतात पुन्हा एकदा महिंद्राची एंट्री जोरदार होणार आहे. कंपनीने अधिकृतरित्या जाहीर केले की तिची सर्वात मोठी आणि अस्सल 7-सीटर इलेक्ट्रिक SUV, Mahindra XEV 9S, अखेर 27 नोव्हेंबर 2025 रोजी लाँच होणार आहे.
ही SUV महिंद्राच्या INGLO इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे आणि कंपनीचा खऱ्या अर्थाने ‘Born Electric’ 7-सीटर प्रोजेक्ट मानला जातो.
लाँच बंगळुरूमध्ये होणाऱ्या ‘Scream Electric’ या भव्य कार्यक्रमात होईल आणि ही महिंद्राच्या इलेक्ट्रिक सफरच्या एका वर्षाच्या सेलिब्रेशनचा भाग असेल.
Introducing the Mahindra XEV 9S – the big, bold, and authentic 7-seater electric origin SUV.
— Mahindra Electric Origin SUVs (@mahindraesuvs) November 1, 2025
Built on the advanced INGLO platform to bring together power, presence, and pure electric performance.
World Premiere at the 'Scream Electric' event on 27th November 2025 at Bengaluru,… pic.twitter.com/RVOHTHjDPn
डिझाइन – फ्युचरिस्टिक आणि खऱ्या अर्थाने इलेक्ट्रिक SUV
महिंद्रा XEV 9S ही कोणत्याही पेट्रोल-डिझेल गाडीवर आधारित नाही. ही सुरुवातीपासून इलेक्ट्रिक म्हणून विकसित केलेली SUV आहे.
डिझाइनची खास वैशिष्ट्ये:
- फ्लॅट-फ्लोर स्ट्रक्चर – प्रचंड केबिन स्पेस
- सेकंड रो स्लाइडिंग सीट्स – प्रिमियम फर्स्ट-क्लास कम्फर्ट
- लो सेंटर ऑफ ग्रॅविटी – अधिक स्टेबल आणि आरामदायी ड्राइव्ह
ही SUV आतून प्रीमियम, स्मार्ट आणि फ्युचर-रेडी असेल, यात शंका नाही.
कंपनीचा दावा आहे की ही SUV अशा लोकांसाठी बनवली आहे ज्यांना मोठी गाडी आवडते, संपूर्ण कुटुंबासोबत प्रवास करणं पसंत करतात आणि इलेक्ट्रिक परफॉर्मन्सवर कोणताही कॉम्प्रोमाइज करत नाहीत.
महिंद्राचे EV व्हिजन आता अधिक ठोस होत आहे आणि XEV 9S हा त्या सफरीचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.
हेही वाचा – Suzuki Fronx ला 5-Star Safety! ASEAN NCAP Crash Test मध्ये कमाल
XEV 7e – XUV700 चा इलेक्ट्रिक अवतार
याच कार्यक्रमात महिंद्रा आणखी एक दमदार SUV सादर करणार आहे – Mahindra XEV 7e
ही लोकप्रिय XUV700 ची इलेक्ट्रिक आवृत्ती असेल.
लीक झालेल्या माहितीप्रमाणे फीचर्स:
- क्लोज्ड-ऑफ फ्रंट ग्रिल
- कनेक्टेड LED लाइटिंग
- ट्रिपल-स्क्रीन इंटीरियर सेटअप
- दोन बॅटरी पर्याय
- 59 kWh – 542 km रेंज
- 79 kWh – 656 km रेंज
दर अंदाजे ₹21 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता.
लाँच : 27 नोव्हेंबर 2025 (अपेक्षित)
टाटा, ह्युंडई, MG, Kia या ब्रँड्समुळे EV स्पर्धा वाढली असली, तरी महिंद्राची Born Electric सीरिज भारतीय ग्राहकांना अगदी हवी-हवी वाटते. 7-सीटर EV हा नवा विभाग आहे आणि महिंद्राने पहिली मोठी चाल खेळली आहे.