Skoda Festival Offer 2023 In Marathi : आता भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होईल. येत्या सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात होणार असून, त्यानंतरही सण सुरूच राहणार आहेत. त्यामुळे अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या मॉडेल्सवर वेगवेगळ्या ऑफर्स आणणार आहेत. स्कोडा इंडिया या 5 स्टार रेटेड कार उत्पादक कंपनीनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर जारी केल्या आहेत. सणासुदीच्या हंगामाचा फायदा घेण्यासाठी स्कोडाने आपल्या स्कोडा स्लाव्हिया आणि स्कोडा कुशाक या शक्तिशाली आणि सुरक्षित कारच्या किमती सुधारल्या आहेत. याशिवाय कंपनीने अनेक प्रकारच्या फेस्टिव्ह ऑफर्सही जारी केल्या आहेत. जर तुम्ही सणासुदीच्या काळात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही कार तुमच्या यादीत ठेवू शकता.
स्कोडाची ही ऑफर (Skoda Festival Offer 2023)
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, स्कोडा स्लाव्हिया (Skoda Slavia) आणि स्कोडा कुशाक (Skoda Kushaq) या गाड्या 10.89 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या आणि आकर्षक किंमतीसह (Offer On Skoda Car) आणल्या गेल्या आहेत. याशिवाय या दोन्ही कारच्या टॉप व्हेरिएंटमध्ये काही खास फीचर्सदेखील जोडण्यात आली आहेत. या दोन्ही कारची किंमत फक्त सणासुदीसाठी 10.89 लाख रुपये असेल.

हेही वाचा – Honda कंपनीची फॉर्मात असलेली गाडी, सिटी आणि अमेझपेक्षाही जास्त विक्री!
टॉप व्हेरिएटमध्ये अनेक नवीन फीचर्स (Skoda Best Offers 2023)
- ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर इलेक्ट्रिक सीट्स
- इल्युमिनेटेट फुटवेल एरिया
- प्ले अॅप्ससह 10-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम
- बूटमध्ये सबवूफर स्टाइल
- कुशाक मॉन्टे कार्लो मध्ये इलेक्ट्रिक सीट्स
- स्कोडा स्लाव्हियाचे मॅट एडिशन लाँच
वर नमूद केलेले फीचर्स स्कोडाच्या स्लाव्हिया मॅट एडिशनमध्येही उपलब्ध आहेत. ही मर्यादित एडिशन सेडान मॅट फिनिशसह कार्बन स्टील पेंटसह येते. कारचे डोअर हँडल आणि ORVM ला डीप ग्लॉसी ब्लॅक रंगात सादर केले आहेत. या कारमध्ये 2 पेट्रोल इंजिन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. यात 1 लिटर आणि 1.5 लिटर पेट्रोल इंजिन पर्याय आहेत.