भारताचा पहिला ‘स्मार्ट टायर’ बाजारात; आता हवा कमी झाली की टायर स्वतः बोलेल, “भाई, भरून घे!”

WhatsApp Group

JK Smart Tyre : भारतामध्ये वाहन सुरक्षेच्या जगात एक मोठी क्रांती घडली आहे. सुप्रसिद्ध जेके टायरने देशाचा पहिला ‘स्मार्ट टायर’ (Smart Tyre) लाँच करत ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये नवा अध्याय लिहिला आहे. आता तुमची कार स्मार्ट असेलच… पण तिचे टायर्सही तुमच्याशी ‘बोलणार’ आहेत! हवा कमी झाली, तापमान वाढले किंवा लीक सुरू झाले की टायर लगेचच ड्रायव्हरला अलर्ट देणार आहे.

मध्यप्रदेशातील बानमोर येथील जेके टायरच्या अत्याधुनिक फॅक्टरीमध्ये तयार झालेले हे स्मार्ट टायर्स देशभरातील JK डीलरशिपवर उपलब्ध होणार आहेत. 14 ते 17 इंच या साइजमध्ये हे प्रीमियम टायर्स ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहेत.

टायरमध्ये बसलेले सेन्सर्स – रिअल-टाईम डेटा थेट ड्रायव्हरकडे

या स्मार्ट टायर्सची सर्वात मोठी खासीयत म्हणजे इनबिल्ट सेन्सर टेक्नोलॉजी. टायरच्या आतच सेन्सर्स बसवले असून ते सतत टायरची स्थिती तपासत राहतात. यात पुढील गोष्टींचा ‘रिअल टाइम’ डेटा मिळतो:

  • टायरचा हवा दाब कमी/जास्त
  • टायरचे तापमान वाढणे
  • एअर लीकिंग
  • टायरची एकूण हेल्थ

हा डेटा ड्रायव्हरला तात्काळ मिळाल्यामुळे अपघात, टायर फेल्युअर, ब्लास्ट आणि वाहनाची खराब परफॉर्मन्स यापासून बचाव होतो. चांगले टायर प्रेशर असल्यास गाडीचे मायलेज वाढते, मेंटेनन्स कमी लागतो आणि टायरचे आयुष्यही जास्त टिकते.

जेके टायरचे चेअरमन डॉ. रघुपति सिंघानिया यांचा दावा

याबाबत बोलताना डॉ. सिंघानिया म्हणाले, “आमचे एम्बेडेड स्मार्ट टायर्स हे जेके टायरच्या इनोव्हेशन प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हे तंत्रज्ञान भारतातील मोबिलिटीला अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि टिकाऊ बनवणार आहे.” कंपनीचे म्हणणे आहे की हे टायर वेगवेगळ्या भारतीय रस्त्यांवर—खड्डे, उष्णता, पावसाळा—सर्व परिस्थितींमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स देतात.

TPMS आधीच आहे? तरीही स्मार्ट टायर कसे वेगळे?

होय, आधुनिक कार्समध्ये TPMS (Tyre Pressure Monitoring System) असतेच. पण जेके टायरचे ‘स्मार्ट टायर’ त्यापेक्षा खूप पुढे आहे

  • टायरचा रिअल टाइम डेटा
  • तापमान + प्रेशर + लीक – तिन्ही गोष्टींची माहिती
  • क्लाउड-बेस्ड अॅनालिटिक्स
  • अचूक हेल्थ रिपोर्ट

कंपनीने 2019 मध्ये ‘SMART Tyre’ टेक्नोलॉजी (TREEL Sensor) आणली होती. तेव्हापासून ही टेक्नोलॉजी कमर्शियल फ्लीट्स, ट्रक आणि कार मालकांमध्ये लोकप्रिय होत आहे.

नवीन टायर लगेच घेऊ नका, पण…

तुमचे सध्याचे टायर्स संपत आले की हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आत्ताचे टायर्स चांगले असतील तर लगेच बदलण्याची गरज नाही.

Leave a Comment