Mahindra XEV 9S : भारतामध्ये 7-सीटर इलेक्ट्रिक SUV शोधणाऱ्या कुटुंबांसाठी चांगली बातमी आहे. महिंद्राने अखेर आपली अत्याधुनिक Mahindra XEV 9S भारतात लाँच केली आहे. ही देशातील INGLO आर्किटेक्चरवर आधारित पहिली 7-सीटर इलेक्ट्रिक SUV आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या खर्चाला कायमचे ‘गुडबाय’ म्हणत मोठी, दमदार आणि टेक्नॉलॉजीने भरलेली EV शोधणाऱ्या फॅमिलीसाठी ही SUV एक मोठी गिफ्टच ठरू शकते.
लाँच प्राइस आणि उपलब्धता
महिंद्रा XEV 9S ची सुरुवातीची किंमत ₹19.95 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. यात एकूण सहा व्हेरिएंट्स देण्यात आले आहेत.
- बुकिंग: 14 जानेवारी 2026 पासून
- डिलिव्हरी: 23 जानेवारी 2026 पासून सुरू
Mahindra XEV 9s exteriors explained!
— 91Wheels.com (@91wheels) November 27, 2025
Which exterior features you like the most? Do let us know in the comments section!#cars #automobile #evs #mahindra #xev9s #91wheels pic.twitter.com/AnMDQR5G2v
XEV 9S ची खास वैशिष्ट्ये — टेक्नॉलॉजी + स्पेस + पॉवरचं परफेक्ट कॉम्बिनेशन
7-सीटर SUV – मोठ्या कुटुंबांसाठी बेस्ट
मोठ्या कुटुंबाला एकत्र प्रवास करू देणारी ही SUV स्पेस आणि कम्फर्ट दोन्हीमध्ये उत्कृष्ट आहे.
ट्रिपल-स्क्रीन कॉकपिट
आतील डॅशबोर्डमध्ये दिलेला ट्रिपल-स्क्रीन सेटअप पाहताच विमानाच्या कॉकपिटची आठवण येते. फ्यूचरिस्टिक आणि नेक्स्ट-लेव्हल अनुभव!
पॅनोरमिक स्कायरूफ
मोठी आणि आल्हाददायक स्कायरूफ संपूर्ण केबिनला हवेशीर, प्रकाशमान आणि प्रीमियम लुक देते.
हेही वाचा – भारतातील सर्वात महाग नंबर प्लेट! तब्बल ₹1.17 कोटींना विक्री
फ्रंक + मोठे बूट स्पेस
- पुढे 150 लिटर फ्रंक
- मागे 527 लिटर बूट स्पेस
लांब प्रवासात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी सहज ठेवता येतात.
दमदार परफॉर्मन्स
तीन बॅटरी पॅक पर्याय: 59kWh, 70kWh, 79kWh
0 ते 100 किमी/तास फक्त 7 सेकंदांत!
व्हेरिएंट व किंमती (एक्स-शोरूम)
| व्हेरिएंट | बॅटरी | किंमत |
|---|---|---|
| Pack One | 59 kWh / 79 kWh | ₹19.95 लाख पासून |
| Pack Two | 70 kWh / 79 kWh | ₹24.45 लाख पासून |
| Pack Three | 79 kWh | ₹27.35 लाख |
| Pack Three Above | 79 kWh | ₹29.45 लाख |
व्हेरिएंट्सची खास वैशिष्ट्ये
Pack One Above – पॉवरफुल एंट्री व्हेरिएंट
- 59 kWh किंवा 79 kWh बॅटरी
- 170 kW–210 kW पॉवर
- 20-180 kW DC चार्जिंग: 20 मिनिटांत 20 ते 80%
- स्कायरूफ
- क्रूज कंट्रोल
- वायरलेस Apple CarPlay/Android Auto
- स्नॅपड्रॅगन चिपसेट
Pack Two Above – लक्झरी + सेफ्टी
- L2 ADAS
- 360° कॅमेरा
- फ्रंट पार्किंग सेन्सर्स
- 16-स्पीकर Harman/Kardon साउंड सिस्टम
- लेदरेट सीट्स
- वेंटिलेटेड फ्रंट सीट्स
- ड्युअल-झोन ऑटो AC
Pack Three & Pack Three Above – टेक्नॉलॉजीचा पावरहाऊस
- 7 एअरबॅग्स (ड्रायव्हर नी एअरबॅगसह)
- L2+ ADAS (5 रडार + 1 व्हिजन कॅमेरा)
- ARHUD VisionX
- सिक्योर360 (Live View + Recording)
- Identity (DOMS) फीचर
- Auto Park Assist – SUV स्वतः पार्क होणार!
- इनबिल्ट व्हिडिओ कॉलिंग