देशातील सर्वात महाग नंबर प्लेट पुन्हा विकली जाणार, कारण काय?

WhatsApp Group

Most Expensive Number Plate India : हरयाणामध्ये काही दिवसांपूर्वी खास नंबर प्लेट लिलावाची प्रचंड चर्चा झाली होती. कारणही तितकंच मोठं — HR 88 B 8888 हा व्हीआयपी नंबर तब्बल ₹1.17 कोटींना लिलावात विकला गेला होता. या विक्रीनंतर हा नंबर देशातील सर्वात महाग नंबर प्लेट म्हणून चर्चेत आली.

आता पुन्हा एकदा हा नंबर चर्चेत आलाय, कारण हा नंबर पुन्हा लिलावात ठेवली जाणार आहे. पण इतक्या महागड्या नंबर प्लेटचा मालक बदलण्याची वेळ का आली? चला, संपूर्ण प्रकरण समजून घेऊया.

देशातील सर्वात महाग नंबर प्लेट पुन्हा विक्रीस

हरयाणामध्ये नुकत्याच झालेल्या लिलावातत HR 88 B 8888 ही नंबर प्लेट ₹1.17 कोटींना रिझर्व करण्यात आली होती. ही बोली सुधीर कुमार नावाच्या व्यक्तीने जिंकली होती.

बोली जिंकूनही पैसे का भरले नाहीत?

लिलावाची सुरुवात केवळ ₹50,000 पासून झाली होती. परंतु अंक “8” ची लोकप्रियता आणि व्हीआयपी नंबरसाठीची क्रेझ यामुळे बोली वेगाने वाढत गेली.

शेवटी सुधीर कुमार यांनी ₹1.17 कोटींची सर्वाधिक बोली लावून हा नंबर जिंकला. पण नियमांनुसार ठराविक वेळेत संपूर्ण रक्कम भरावी लागते—त्यातच अडथळा आला!

हेही वाचा – Tata Sierra 2025 : वायपर ‘गायब’, आत थिएटर, बाहेर फ्युचर..’या’ 5 फीचर्समुळे गाडी पाहून थक्क व्हाल!

सुधीर कुमार यांनी वेळेत पैसे जमा केले नाहीत आणि त्यांनी नंतर सांगितले की, “ही नंबर प्लेट अतिशय महाग आहे, मी ती किंमत देऊ शकणार नाही.” यामुळे देशातील सर्वात महाग नंबर प्लेट होण्याची संधी HR 88 B 8888 चुकली.

आता होणार लिलाव – पुन्हा एकदा संधी!

हा नंबर आता पुन्हा लिलावासाठी खुला करण्यात येणार आहे. नवीन लिलावात शुक्रवारपासून सुरू होणार. रिझर्व किंमत — ₹50,000 (जशीच्या तशी). बोली प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ₹10,000 जमा करावे लागतील महत्त्वाचं म्हणजे बोली जिंकूनही ठराविक वेळेत संपूर्ण रकम भरली नाही, तर जमा केलेले ₹10,000 परत मिळणार नाहीत.

“8888” नंबर इतका महाग का?

✔ “8” हा फेंगशुईमध्ये लकी नंबर मानला जातो
✔ सलग “8888” अत्यंत शुभ, पैसा-वाढ, समृद्धीचे प्रतीक
✔ बिझनेस मालक, सेलेब्रिटी आणि व्हीआयपी लोकांमध्ये या नंबरला मागणी

म्हणूनच हा नंबर पुन्हा एकदा मोठी बोली खेचून घेईल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment