Maruti e-Vitara :  मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV, तब्बल 543 किमी रेंज, सुरक्षा रेटिंगही 5 स्टार!

WhatsApp Group

Maruti e-Vitara : Maruti Suzuki अखेर आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV e-Vitara चे संपूर्ण फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आणले आहेत. कंपनीचा दावा आहे की ही EV फुल चार्जमध्ये तब्बल 543 किमी रेंज देईल. यामध्ये दोन शक्तिशाली बॅटरी पॅक, लेव्हल-2 ADAS, 7 एअरबॅग्स, 360° कॅमेरा आणि भारत NCAP ची 5-स्टार सुरक्षा रेटिंग अशी अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये मिळतील.

भारतासह तिचे लाँचिंग जानेवारी 2026 मध्ये होणार असून त्याच महिन्यात जपानमध्येही ही SUV लाँच होईल.

दोन बॅटरी पॅक – 49kWh आणि 61kWh (रेंज 543 किमीपर्यंत)

HERATECT-e प्लॅटफॉर्मवर विकसित केलेल्या e-Vitara मध्ये दोन बॅटरी ऑप्शन्स दिले जातील:

  • 49kWh (Delta ट्रिम)
  • 61kWh (Zeta आणि Alpha ट्रिम्स)

61kWh बॅटरी पॅक फुल चार्जमध्ये 543 किमी धावेल, असा मारुतीचा दावा आहे. ही SUV फ्रंट व्हील ड्राईव्ह (FWD) मध्ये येणार आहे.

हेही वाचा – देशातील सर्वात महाग नंबर प्लेट पुन्हा विकली जाणार, कारण काय?

DC फास्ट चार्जिंग : फक्त 45 मिनिटांत 80% चार्ज

  • DC फास्ट चार्जरवर ही EV केवळ 45 मिनिटांत 80% चार्ज होते.
  • ही कार प्रीमियम Nexa डीलरशिपमधून विक्रीस येणार आहे.

BaaS मॉडेल – आता कार बिनाबॅटरीही खरेदी करा!

e-Vitara Battery-as-a-Service (BaaS) सब्सक्रिप्शनसहही उपलब्ध असेल.
याचा अर्थ:

  • कस्टमरला कार बिनाबॅटरी स्वस्तात मिळेल
  • बॅटरी भाड्याने (subscription) घ्यावी लागेल
  • मेंटेनन्स खर्च आणखी कमी

फीचर्स – SUV सेगमेंटमध्ये सर्वात अ‍ॅडव्हान्स पर्याय

इंटीरियर आणि टेक्नॉलॉजी

  • 26.04 सेमी मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले
  • 25.65 सेमी टचस्क्रीन इंफोटेनमेंट
  • सनरूफ (फिक्स्ड ग्लास)
  • वायरलेस चार्जिंग
  • वेंटिलेटेड सीट्स
  • 10-वे ड्रायव्हर सीट अॅडजस्टमेंट
  • अ‍ॅम्बियंट लाईटिंग
  • इनफिनिटी ऑडियो सिस्टम
  • रियर सीट रिक्लाइन + स्लाइड ऑप्शन

 सुरक्षा

  • भारत NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग
  • 7 एअरबॅग्स
  • लेव्हल-2 ADAS
    • अ‍ॅडॅप्टिव क्रूज कंट्रोल
    • लेन कीप असिस्ट
    • ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग
  • 360° कॅमेरा
  • हिल डिसेंट कंट्रोल
  • इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक + ऑटो होल्ड

“E for Me” अॅप – EV चार्जिंग आता अधिक सोपे

मारुतीचे उद्दिष्ट आहे की प्रत्येक 5–10 किमी अंतरावर एक चार्जर उपलब्ध असेल. यासाठी कंपनीने “E for Me” अॅप विकसित केले आहे, ज्याद्वारे:

  • घरच्या चार्जिंगची सोय
  • सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सची लोकेशन
  • सहज पेमेंट आणि मॉनिटरिंग

कंपनीकडे सध्या:

  • 1300 EV-रेडी सर्विस सेंटर
  • 1.5 लाख प्रशिक्षित EV वर्कफोर्स

2000+ चार्जिंग प्वाइंट्स – 2030 पर्यंत 1 लाख चार्जर्सचे लक्ष्य

  • भारतभर 2000 पेक्षा जास्त चार्जिंग प्वाइंट्स तयार
  • 13 CPO (Charging Point Operators) सोबत भागीदारी
  • 2030 पर्यंत 1 लाख चार्जर्स इंस्टॉल करण्याचा प्लॅन
  • e-Vitara च्या बॅटरीमध्ये 120 लिथियम-आयन सेल्स
  • -30°C ते 60°C तापमानातही स्टेबल परफॉर्मन्स

Leave a Comment