दिल्लीमध्ये नेमकं चाललंय काय? बाहेरील वाहनांवर थेट बंदी, सरकारने शेवटी हात टेकले!

WhatsApp Group

Delhi Pollution : दिल्लीतील विषारी हवेचा प्रश्न आता इतका गंभीर झाला आहे की, सरकारलाही परिस्थितीची तीव्रता मान्य करावी लागली आहे. राजधानीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) सातत्याने ‘Severe’ म्हणजेच अतिगंभीर श्रेणीत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे पर्यावरण मंत्री मंजिंदर सिंह सिरसा यांनी थेट दिल्लीतल्या नागरिकांची माफी मागितली आहे.

“प्रदूषण एका रात्रीत कमी होणार नाही” – मंत्री सिरसा

16 डिसेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सिरसा म्हणाले की, “कोणत्याही निवडून आलेल्या सरकारसाठी 9-10 महिन्यांत AQI नियंत्रणात आणणे अशक्य आहे. दिल्लीतील प्रदूषणासाठी मी नागरिकांची माफी मागतो. ही प्रदूषणाची समस्या आम्हाला आम आदमी पार्टी सरकारकडून वारशात मिळाली आहे, आणि आम्ही ती सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत.”

18 डिसेंबरपासून बाहेरील वाहनांवर बंदी

सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवार, 18 डिसेंबरपासून दिल्लीमध्ये बाहेरून येणाऱ्या केवळ BS-VI दर्जाच्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
BS-VI पेक्षा खालच्या श्रेणीतील कोणतेही वाहन दिल्लीमध्ये प्रवेश करू शकणार नाही.

याशिवाय, वैध ‘Pollution Under Control Certificate (PUCC)’ नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन देण्यास नकार दिला जाणार आहे.

AQI अजूनही धोकादायक

मंत्री सिरसा यांनी आकडेवारी मांडताना सांगितले की,

  • आजचा AQI: 363 (अतिगंभीर श्रेणी)
  • मागील वर्षी याच दिवशी AQI: 380

त्यांच्या मते, गेल्या 10 वर्षांपासून दिल्लीतील AQI जवळपास याच पातळीवर आहे.

डिझेल जनरेटरवर कारवाई, नियम न पाळणाऱ्यांवर दंड

दिल्लीतील डिझेल जनरेटरवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.

  • CAQM (Commission for Air Quality Management) च्या नियमांचे पालन बंधनकारक
  • Catalytic Converter बसवण्याचे आदेश
  • आतापर्यंत ३२ जनरेटरची तपासणी, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

हेही वाचा – “मेस्सीच खरा दोषी!”, सुनील गावसकरांचे परखड मत चर्चेत!

लाकूड जाळणे थांबवण्यासाठी सरकारचा नवा उपाय

दिल्लीतील लाकूड जाळण्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने 10000 सुरक्षारक्षकांना हीटर वाटप केले आहेत.
यामुळे आता त्यांना लाकूड जाळण्याची गरज भासणार नाही, असा सरकारचा दावा आहे.

कचऱ्याचे डोंगर कमी, जंगल उभे

AAP सरकारवर टीका करताना मंत्री सिरसा म्हणाले,

  • दिल्लीतील 202 एकर कचऱ्याच्या डोंगरांपैकी 45 एकर पूर्णपणे साफ
  • त्या भागात वृक्षारोपण सुरू
  • 7 एकर क्षेत्रात दाट जंगल उभे राहत आहे
  • “जे काम AAP सरकार 11 वर्षांत करू शकले नाही, ते आम्ही 10 महिन्यांत केले,” असा दावा

ब्रिटन, कॅनडा, सिंगापूरची ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी

दिल्लीतील बिघडलेल्या हवेची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे.
१५ डिसेंबर रोजी ब्रिटन, कॅनडा आणि सिंगापूर यांनी आपल्या नागरिकांसाठी Delhi-NCR संदर्भात ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

  • सिंगापूर हाय कमिशन: प्रवासापूर्वी AQI तपासण्याचा सल्ला
  • UK FCDO: गर्भवती महिला, हृदयरोगी व श्वसनरोगी व्यक्तींनी प्रवासापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
  • कॅनडा: दिल्ली प्रवास करताना नियमितपणे हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश

धुक्यामुळे 228 फ्लाइट्स रद्द

प्रदूषणासोबतच दाट धुक्यामुळे व्हिजिबिलिटी घटली असून, दिल्ली विमानतळावर मोठा परिणाम झाला आहे.

  • 228 हून अधिक उड्डाणे रद्द
  • 5 फ्लाइट्स डायव्हर्ट
  • DIAL प्रशासनाकडून प्रवाशांसाठी मदत कक्ष सक्रिय

Leave a Comment