Hyundai Prime Taxi Range : भारतातील आघाडीची कार निर्माता कंपनी Hyundai Motor India ने कमर्शियल टॅक्सी मार्केटसाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. कंपनीने नवीन “Prime Taxi Range” लाँच केली असून यामध्ये एक हॅचबॅक आणि एक कॉम्पॅक्ट सेडान कारचा समावेश आहे. या गाड्यांना अनुक्रमे Prime HB (हॅचबॅक) आणि Prime SD (सेडान) अशी नावे देण्यात आली आहेत.
या दोन्ही मॉडेल्स प्रत्यक्षात लोकप्रिय Hyundai Grand i10 Nios आणि Hyundai Aura यांचे टॅक्सी-स्पेशल व्हर्जन आहेत. म्हणजेच आता फ्लीट ऑपरेटर्स आणि टॅक्सी चालकांना जास्त मायलेज, कमी मेंटेनन्स आणि जास्त कमाईची संधी मिळणार आहे.
या कारमध्ये काय खास आहे?
ह्युंदाईने या दोन्ही टॅक्सी मॉडेल्समध्ये सेफ्टी आणि कम्फर्टला मोठं प्राधान्य दिलं आहे. मिळणारी प्रमुख वैशिष्ट्ये अशी—
- 6 एअरबॅग्स
- चारही पॉवर विंडोज
- रिअर एसी वेंट्स
- हाइट-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट
- स्टीयरिंगवर ऑडिओ कंट्रोल्स
- फ्रंट फास्ट USB चार्जर
- रिअर डीफॉगर
- रिअर पार्किंग सेन्सर
- थ्री-पॉइंट सीटबेल्ट्स
याशिवाय ऑप्शनल स्वरूपात—
- पॅनिक बटन
- व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग सिस्टम
- रिअर कॅमेरा
- 9-इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम
- वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay
असे अत्याधुनिक फीचर्सही मिळतात. त्यामुळे प्रवास अधिक सेफ, आरामदायी आणि टेक-फ्रेंडली होतो.
हेही वाचा – भारताची सर्वाधिक विकली जाणारी कार, पण सेफ्टी Star फक्त 1!
इंजिन किती दमदार?
दोन्ही कारमध्ये कंपनीने 1.2-लीटर Kappa पेट्रोल इंजिन दिलं आहे. खास बाब म्हणजे फॅक्ट्री-फिटेड CNG ऑप्शन देखील उपलब्ध आहे. त्यामुळे कमी खर्चात जास्त रनिंग करणाऱ्या टॅक्सी ऑपरेटर्ससाठी हा एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो.
#JustIn | #HyundaiMotor India;
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) December 30, 2025
▶️Enters commercial mobility segment with the launch of Prime Taxi Range pic.twitter.com/avqejkKbpK
ह्युंदाईच्या अधिकाऱ्यांचं वक्तव्य
Hyundai Motor India चे एमडी तरुण गर्ग यांच्या मते—
“Prime HB आणि Prime SD लाँच करून आम्हाला कमर्शियल ट्रान्सपोर्ट सेगमेंटमध्ये प्रवेश करताना अभिमान वाटतो. या कार्स विश्वास, विश्वासार्हता आणि चांगल्या कमाईसाठी खास डिझाइन करण्यात आल्या आहेत. फ्लीट ऑपरेटर्सना कमीत कमी मेंटेनन्स, जास्त अपटाइम आणि कमी ऑपरेटिंग कॉस्ट हवी असते – आणि हाच विचार करून प्राईम रेंज विकसित करण्यात आली आहे.”
किंमत किती?
ह्युंदाईने या टॅक्सी रेंजची किंमत अतिशय स्पर्धात्मक ठेवली आहे—
- Prime HB (हॅचबॅक) – ₹ 6,00,000 (एक्स-शोरूम)*
- Prime SD (सेडान) – ₹ 6,90,000 (एक्स-शोरूम)*
(किंमती शहर आणि डीलरनुसार बदलू शकतात)
कोणासाठी सगळ्यात बेस्ट?
ही टॅक्सी रेंज विशेषतः—
✔ फ्लीट ऑपरेटर्स
✔ राईड-शेअरिंग ड्रायव्हर्स
✔ लाँग-रन टॅक्सी सर्विसेस
यांच्यासाठी बनवली आहे. कमी खर्चात जास्त विश्वासार्हता आणि सुरक्षितता शोधणाऱ्यांसाठी हा एक दमदार पर्याय ठरू शकतो.