Yamaha Electric Scooter EC-06 : भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वेग झपाट्याने वाढत असताना, जगप्रसिद्ध दुचाकी उत्पादक यामाहा मोटर इंडियाने मोठा धमाका केला आहे. यामाहाने अखेर आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘Yamaha EC-06’ भारतीय बाजारात अधिकृतपणे सादर केली असून, उत्कृष्ट रेंज, अत्याधुनिक फीचर्स आणि विश्वासार्ह ब्रँडमुळे ही स्कूटर लाँच होताच चर्चेचा विषय ठरला आहे. शहरी प्रवास अधिक पर्यावरणपूरक आणि किफायतशीर करण्याच्या दिशेने यामाहाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
Yamaha EC-06 भारतात लाँच
यामाहाने भारतातील इलेक्ट्रिक वाहन विभागात अधिकृत प्रवेश करत EC-06 हा पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, मजबूत बांधणी आणि आकर्षक डिझाइन यांचा उत्तम मेळ या स्कूटरमध्ये पाहायला मिळतो.
हा स्कूटर विशेषतः दैनंदिन शहरी वापरासाठी तयार करण्यात आला असून, तरुणाईसह नोकरीपेशा ग्राहकांना लक्षात ठेवून याची रचना करण्यात आली आहे.
#BREAKING ➡️ Yamaha's FIRST electric scooter for India has been launched at ₹1.68 lakh (ex-showroom)
— carandbike (@carandbike) February 2, 2026
The Yamaha EC-06 is based on the River Indie, has the same 4 kWh battery, and a certified range of up to 169 km. Available in 'select cities'
Would you have this, or the Indie? pic.twitter.com/cZ7OZV47nK
Yamaha EC-06 चे जबरदस्त फीचर्स
Yamaha EC-06 मध्ये कंपनीने सुरक्षितता, आराम आणि स्मार्ट तंत्रज्ञानावर भर दिला आहे. या स्कूटरमध्ये खालील प्रमुख वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत:
- इको, स्टँडर्ड आणि पॉवर असे तीन रायडिंग मोड
- टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन
- मागील बाजूस हायड्रॉलिक डॅम्पर्स
- पुढे आणि मागे डिस्क ब्रेक
- कॉम्बी ब्रेक प्रणाली
- एलईडी हेडलाईट आणि एलईडी टेललाईट
- डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
- यामाहा मोटर कनेक्ट आर स्मार्ट कनेक्टिव्हिटी
- 24.5 लिटर क्षमतेचा मोठा बूट स्पेस
या सर्व सुविधांमुळे Yamaha EC-06 हा स्कूटर आपल्या वर्गात वेगळा ठरतो.
बॅटरी, रेंज आणि परफॉर्मन्स
Yamaha EC-06 मध्ये 4 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 8 तासांचा वेळ लागतो.
एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर तब्बल 169 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा कंपनीचा दावा आहे, जो या सेगमेंटमध्ये अत्यंत प्रभावी मानली जात आहे.
स्कूटरमध्ये बसवलेल्या इलेक्ट्रिक मोटरमधून:
- 6.7 किलोवॅट शक्ती
- 26 न्यूटन मीटर टॉर्क
मिळतो. यामुळे Yamaha EC-06 ला 79 किमी प्रतितास कमाल वेग गाठता येतो.
यामाहा इंडियाच्या अध्यक्षांचे वक्तव्य
यामाहा मोटर इंडियाचे अध्यक्ष हाजिमे आओटा यांनी या लाँचबाबत सांगितले की,
“EC-06 ही शाश्वत शहरी वाहतुकीच्या दिशेने यामाहाचा महत्त्वाचा टप्पा आहे. भारत सरकारच्या कार्बन-न्यूट्रल भविष्यासाठीच्या धोरणाशी सुसंगत राहून, आम्ही उच्च दर्जाचे इलेक्ट्रिक नवोन्मेष सादर करत आहोत. हा स्कूटर कार्यक्षमता, परफॉर्मन्स आणि दीर्घ रेंज यांचा उत्कृष्ट समतोल साधतो.”
Yamaha EC-06 ची किंमत आणि वॉरंटी
यामाहाने आपली पहिला इलेक्ट्रिक स्कूटर ₹1.67 लाख (एक्स-शोरूम) किंमतीत भारतीय बाजारात आणला आहे.
यासोबतच:
- बॅटरीवर 3 वर्षे किंवा 30,000 किलोमीटर इतकी वॉरंटी देण्यात आली आहे.
ही किंमत पाहता, प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर शोधणाऱ्या ग्राहकांसाठी Yamaha EC-06 हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.