EV Charging Fire : मध्य प्रदेशातील इंदौर येथे 18 मार्चच्या मध्यरात्री एक अत्यंत भीषण आग लागून 7 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना इतकी भयावह होती की काही मिनिटांत संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले.
EV चार्जिंगमधूनच दुर्घटनेची सुरुवात
मिळालेल्या माहितीनुसार, घराबाहेर उभी असलेली इलेक्ट्रिक कार चार्जिंगला लावलेली होती. चार्जिंग बोर्डमध्ये अचानक स्पार्किंग झाली आणि त्यातून कारला आग लागली. काही क्षणांतच ही आग घरात पसरली.
🚨SHOCKING | Indore house fire that killed 7 people.
— The Tatva (@thetatvaindia) March 18, 2026
EV charging blast started it, then 10 LPG cylinders exploded one after another. Electronic locks trapped family inside pic.twitter.com/oiBB42YUx2
लॉक झालेलं घर ठरलं मृत्यूचं कारण
घरामध्ये इलेक्ट्रॉनिक लॉक सिस्टम बसवलेली होती. आग लागल्यावर वीजपुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे सर्व दरवाजे आपोआप लॉक झाले. यामुळे घरातील लोकांना बाहेर पडता आले नाही आणि ते आतच अडकले.
गॅस सिलेंडर स्फोटामुळे वाढली तीव्रता
आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. आगीच्या ज्वाळा झपाट्याने वाढल्या आणि संपूर्ण घर जळून खाक झाले.
बचावकार्य आणि प्रशासनाची धावपळ
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, SDRF आणि पोलिसांची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. जवळपास 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला होता.
Seven died after fire blaze at a building in Indore, Madhya Pradesh. The fire most likey triggered from EV charging malfunction pic.twitter.com/L4sFObDuvd
— Piyush Rai (@Benarasiyaa) March 18, 2026
पोलिसांची माहिती
इंदौरचे पोलिस आयुक्त संतोष सिंह यांनी सांगितले की, पहाटे 4 वाजता घटनेची माहिती मिळाली. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले, परंतु ज्वाळांची तीव्रता अत्यंत मोठी होती.