Kia Syros EV India Launch Price Range : भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची (EV) वाढती मागणी लक्षात घेता, प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी ‘किआ इंडिया’ने (Kia India) आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘किआ सायरोस ईव्ही’ (Kia Syros EV) अधिकृतपणे लाँच केली आहे. ‘केरेन्स क्लॅव्हिस ईव्ही’नंतर ही किआची भारतीय बाजारातील दुसरी मास-मार्केट इलेक्ट्रिक कार ठरली आहे. ७.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत ‘बॅटरी-ॲज-अ-सर्व्हिस’ (BaaS) मॉडेलअंतर्गत ही कार खरेदी करता येणार असून, इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या क्षेत्रात ग्राहकांना अधिक किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या कारची डिलिव्हरी ३० जुलैपासून सुरु होणार आहे.
बॅटरी पर्याय आणि ‘BaaS’ मॉडेलचे अर्थशास्त्र
किआ सायरोस ईव्ही ही कंपनीच्या मजबूत ‘K1’ प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ग्राहकांच्या विविध गरजा विचारात घेऊन कंपनीने ही एसयूव्ही दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिली आहे—४२ kWh आणि ५१.४ kWh.
Kia Syros EV launched at ₹13.50 lakh.
— Motor Scoop (@motorscoop_) July 23, 2026
✅ BaaS prices start at ₹7.99 lakh.
Key Highlights:
🔋 42 kWh – 443 km range
🔋 51.4 kWh – 526 km range
⚡ Up to 171 PS
🏁 0-100 km/h in 8.1 sec
🔌 10-80% DC charging in 39 mins#MotorScoop #KiaSyrosEV #Kia #KiaSyros #KiaIndia pic.twitter.com/A9f2dT4pwN
‘बॅटरी-ॲज-अ-सर्व्हिस’ (BaaS) या नवीन विक्री मॉडेलनुसार, ग्राहक केवळ वाहनाची मूळ किंमत (७.९९ लाख रुपयांपासून पुढे) भरून कार खरेदी करू शकतात, तर बॅटरीचा खर्च वेगळा फायनान्स केला जाईल. यासाठी ग्राहकांना ३.३ रुपये प्रति किलोमीटर या दराने बॅटरीचा ईएमआय (EMI) द्यावा लागेल. यामुळे कार खरेदीचा सुरुवातीचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे.
जर ग्राहकांना संपूर्ण बॅटरीसह कार खरेदी करायची असल्यास, ४२ kWh बॅटरीच्या ‘HTK’ या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १३.४९ लाख रुपये आहे. तर ५१.४ kWh (एक्स्टेंडेड रेंज) बॅटरी असलेल्या टॉप-स्पेक्ट्रम ‘X-Line ER’ व्हेरियंटची किंमत १९.९९ लाख रुपयांपर्यंत जाते.
| बॅटरी पॅक | व्हेरियंट | एक्स-शोरूम किंमत (रुपये) |
| 42 kWh | HTK | ₹ १३.४९ लाख |
| 42 kWh | HTK+ | ₹ १४.९९ लाख |
| 42 kWh | HTX | ₹ १५.९९ लाख |
| 51.4 kWh (ER) | HTK+ ER | ₹ १६.९९ लाख |
| 51.4 kWh (ER) | HTX ER | ₹ १७.९९ लाख |
| 51.4 kWh (ER) | HTX+ ER | ₹ १९.४९ लाख |
| 51.4 kWh (ER) | X-Line ER | ₹ १९.९९ लाख |
कामगिरी, मायलेज आणि चार्जिंग तंत्रज्ञान
मायलेज आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत सायरोस ईव्हीने आपल्या सेगमेंटमध्ये नवीन मानक प्रस्थापित केले आहे. ARAI-सर्टिफाइड MIDC सायकलनुसार, ४२ kWh बॅटरी व्हेरियंट एका पूर्ण चार्जमध्ये ४४३ किलोमीटरचे अंतर कापते. दुसरीकडे, ५१.४ kWh बॅटरी पॅक असलेले मॉडेल ५२६ किलोमीटरची प्रमाणित रेंज देते. यासह, ५०० किलोमीटरहून अधिक प्रमाणित रेंजचा टप्पा ओलांडणारी ही आपल्या श्रेणीतील पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ठरली आहे.
या कारमधील इलेक्ट्रिक मोटर १७१ PS (सुमारे १६९ bhp) ची शक्ती निर्माण करते, ज्यामुळे ही एसयूव्ही अवघ्या ८.१ सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग धारण करू शकते. चार्जिंगचा विचार करता, यामध्ये १०० kW DC फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली असून, अवघ्या ३९ मिनिटांत बॅटरी १० टक्के ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. याशिवाय, दैनंदिन वापरासाठी १०.८ kW चा ऑनबोर्ड AC चार्जरही उपलब्ध आहे.
लक्झरी डिझाइन आणि आधुनिक फीचर्सची रेलचेल
बाह्य डिझाइनचा विचार केल्यास, सायरोस ईव्हीमध्ये किआची वैशिष्ट्यपूर्ण ‘डिजिटल टायगर फेस’ ग्रिल, आईस क्यूब एलईडी हेडलाइट्स, स्टार मॅप एलईडी डीआरएल, फ्लश-फिटिंग डोअर हँडल्स आणि १७-इंचाचे ड्युअल-टोन एरो अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
केबिनच्या आत ३०-इंचाचा विशाल पॅनोरमिक डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये १२.३-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, १२.३-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ५-इंचाचा क्लायमेट कंट्रोल इंटरफेस यांचा समावेश आहे.
इतर प्रीमियम फीचर्समध्ये ड्युअल-पेन पॅनोरमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट आणि रिअर सीट्स, ८-स्पीकर हार्मन कार्डन (Harman Kardon) ऑडिओ सिस्टीम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, ३६०-डिग्री कॅमेरा, १६-लिटरची फ्रंक (पुढील ट्रंक) जागा आणि लेव्हल-२ ADAS तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
सुरक्षा अन् विक्रीपश्चात सेवांवर भर
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या एसयूव्हीमध्ये ६ एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), हिल-स्टार्ट असिस्ट, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर यांसारखे सुरक्षा फीचर्स समाविष्ट आहेत.
ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी किआने पहिल्या मालकासाठी हाय-व्होल्टेज बॅटरीवर १५ वर्षांची अमर्याद किलोमीटर वॉरंटी जाहीर केली आहे. तसेच, तीन वर्षांनंतर कारची पुनर्विक्री मूल्य (Resale Value) ८० टक्क्यांपर्यंत देणारा ‘ॲश्युअर्ड बायबॅक प्रोग्राम’ देखील सादर केला आहे. चार्जिंगची सोय सुलभ व्हावी म्हणून कंपनीच्या ‘K-Charge’ नेटवर्कद्वारे देशभरात २०,३०० हून अधिक चार्जिंग पॉइंट्सची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.