Tata Safari 2023 In Marathi : देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या प्रसिद्ध SUV सफारीचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल देशांतर्गत बाजारात लाँच केले आहे. कंपनीने या गाडीमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे ती मागील मॉडेलपेक्षा खूप चांगली दिसते. आकर्षक लूक आणि पॉवरफुल फीचर्सने सुसज्ज असलेल्या, नवीन टाटा सफारीची सुरुवातीची किंमत 16.19 लाख रुपये आहे, जी टॉप मॉडेलसाठी 25.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
कशी आहे नवीन टाटा सफारी? (Tata Safari 2023 Facelift)
कंपनीने टाटा सफारीचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल अनेक मोठ्या बदलांसह सादर केले आहे. ही एसयूव्ही अॅडवान्स फीचर्सने सुसज्ज असतानाच, तिचे मायलेजही पूर्वीपेक्षा वाढले आहे. कंपनीने 2 लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन वापरले आहे, जे 170PS पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करते. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स फक्त Adventure+ प्रकारात उपलब्ध आहे.

किती मायलेज देते? (New Tata Safari 2023)
नवीन टाटा सफारी चार मुख्य ट्रिममध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये स्मार्ट, प्युअर, अॅडव्हेंचर आणि अॅक्प्लिश्ड यांचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की सफारीचे मॅन्युअल व्हेरिएंट 16.30 किमी/लीटर पर्यंत मायलेज देते आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट 14.50 किमी/लीटर पर्यंत मायलेज देते.
हेही वाचा – VIDEO : चांगल्या मायलेजसाठी स्कूटरला लावा CNG किट! किती खर्च येईल?

टाटा सफारीला LED डे-टाइम रनिंग लाइट्स (DRL’s) मिळतात. याव्यतिरिक्त, गाडीला अलॉय व्हील, मागील स्किड प्लेट आणि कारच्या बाजूला नक्षीदार सफारी बॅजसाठी नवीन डिझाईन मिळते.