2023 Tata Harrier In Marathi : बर्याच प्रतीक्षेनंतर टाटा हॅरियर फेसलिफ्ट भारतात लाँच करण्यात आली आहे. टाटाने 2023 हॅरियरला पूर्णपणे नवीन डिझाइन दिले आहे आणि त्याची फीचर्सदेखील लक्षणीयरीत्या अपडेट करण्यात आली आहेत. नवीन टाटा हॅरियरची किंमत 15.49 लाख रुपयांपासून सुरू होते (एक्स-शोरूम). लाँच झाल्यापासून, ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये सुरक्षिततेसाठी या गाडीला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.
टाटाने हॅरियर चार व्हेरिएंटंध्ये येते. स्मार्ट, प्युअर, अॅडव्हेंचर आणि फियरलेस. या SUV मध्ये तुम्हाला सनलाइट यलो, कोरल रेड, पेबल ग्रे, लुनर व्हाइट, ओबेरॉन ब्लू, सीवीड ग्रीन आणि अॅश ग्रे असे 7 कलर ऑप्शन्स मिळतील.
इंजिन आणि मायलेज (Tata Harrier Facelift 2023 In Marathi)
इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास हॅरियर फेसलिफ्टमध्ये 2-लिटर डिझेल इंजिन आहे जे 170 पीएस पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनासोबतच यात 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. याच्या मॅन्युअल व्हेरिएंटंला 16.80 किमी प्रति लिटर आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटंला 14.60 किमी प्रति लीटर मायलेज मिळते.
हेही वाचा – नवीन टाटा सफारीची चर्चा का होतेय? जाणून घ्या किंमत आणि मायलेज!
2023 हॅरियरमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारी 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच फुल डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 10-स्पीकर JBL साउंड सिस्टीम यांसारखी फीचर्स आहेत.
या गाडीत (Tata Harrier 2023) मल्टी-कलर अॅम्बियंट लाइटिंग, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एसी, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 6-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, वायरलेस फोन चार्जिंग, पॅनोरामिक सराउंड (मूड लाइटिंगसह), जेश्चर इनेबल पॉवर टेलगेट आणि एअर प्युरिफायर यांसारखी फीचर्स आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, यात 7 एअरबॅग्ज, हिल असिस्टसह इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) यांसारखी फीचर्स आहेत. यात अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) देखील आहे, ज्या अंतर्गत आता त्यात अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल फीचर देखील आहे.
टाटा हॅरियरची स्पर्धा महिंद्रा XUV700, एमजी हेक्टर आणि जीप कंपासशी आहे. किंमतीच्या आघाडीवर, ही गाडी ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टोसच्या टॉप व्हेरिएंटशी देखील स्पर्धा करते.