Best Automatic Cars Under 7 Lakhs : गेल्या काही काळापासून लोकांना ऑटोमॅटिक कार आवडू लागल्या आहेत. हे लक्षात घेऊन कंपन्या आता त्यांच्या स्वस्त कार ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून देत आहेत. ऑटोमॅटिक कारमध्ये गीअर्स वारंवार बदलण्याचा त्रास होत नाही. यामुळे या गाड्या ट्राफिकमध्ये चालवणे सोपे जाते. याशिवाय, या कार त्यांच्या मॅन्युअल व्हेरिएंटपेक्षा जास्त मायलेज देतात. जर तुम्ही ऑटोमॅटिक कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 6 ते 8 लाख रुपयांच्या दरम्यान असेल, तर आम्ही तुम्हाला अशा 5 सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कारबद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्या बजेटमध्ये बसतील.
1. Maruti Suzuki Alto K10 (Best Automatic Cars Under 7 Lakhs)
मारुती अल्टो K10 ही या यादीतील ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त कार आहे. अल्टोच्या ऑटोमॅटिक मॉडेलची किंमत 5.61 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. Alto K10 VXI या ट्रान्समिशनमध्ये येतो. कंपनीने यात 1-लिटर इंजिन बसवले आहे. ऑटोमॅटिक व्हेरिएंटचे मायलेज 25 किलोमीटर प्रति लिटर आहे.

2. Maruti Suzuki S-Presso (Best Automatic Cars Under 7 Lakhs)
मारुती एस-प्रेसो देखील ऑटोमॅटिक पर्यायासह ऑफर केली जाते. त्याचे VXI प्रकार दोन ट्रिम्सच्या निवडीसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध केले गेले आहे. यात एक लिटर क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. त्याची किंमत 5.76 लाख रुपयांपासून सुरू होते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये एस-प्रेसोचे मायलेज 25.3 किलोमीटर प्रति लिटर आहे.

3. Renault Kwid (Best Automatic Cars Under 7 Lakhs)
रेनॉल्ट क्वि़डच्या ऑटोमॅटिक मॉडेलची किंमत 6.12 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. त्याच्या दोन व्हेरिएंटमध्ये 1.0-लिटर इंजिनसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. याचे मायलेज 22 किलोमीटर प्रति लिटर आहे.

हेही वाचा – Top 25 Best Selling Cars : आख्खा भारत ‘या’ 25 गाड्यांच्या प्रेमात!
4. Maruti Suzuki Celerio (Best Automatic Cars Under 7 Lakhs)
मारुती सेलेरिओ देखील ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह सादर करण्यात आला आहे. कंपनी त्यात 1-लिटर 998cc इंजिन देते. ही कार पेट्रोलसोबतच सीएनजीमध्येही उपलब्ध आहे. त्याचे VXI आणि ZXI प्रकार स्वयंचलित ट्रांन्समिशनमध्ये ऑफर केले जातात. त्याची किंमत 6.38 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. सेलेरिओ ऑटोमॅटिकचे मायलेज 26.68 किलोमीटर प्रति लिटर आहे.

5. Maruti Suzuki WagonR (Best Automatic Cars Under 7 Lakhs)
मारुती वॅगनआरचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट 1.2-लिटर इंजिनसह उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट VXi ट्रिमपासून सुरू होतात. त्याची किंमत 6.54 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. याचे मायलेज 25.19 किलोमीटर प्रति लिटर आहे.
